६ डिसेंबर दिनविशेष | 6 December Dinvishesh | 6 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 6, 2023

६ डिसेंबर दिनविशेष | 6 December Dinvishesh | 6 December day special in Marathi

६ डिसेंबर दिनविशेष

6 December Dinvishesh

6 December day special in Marathi

११ डिसेंबर दिनविशेष | 11 December Dinvishesh | 11 December day special in Marathi

            ६ डिसेंबर दिनविशेष ( 6 December Dinvishesh | 6 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ६ डिसेंबर दिनविशेष | 6 December Dinvishesh | 6 December day special in Marathi बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

६ डिसेंबर दिनविशेष

6 December Dinvishesh

6 December day special in Marathi


@ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन [ Dr. Babasaheb Ambedkar death anniversary ] Read More

[१४२१]=> इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचा जन्म.

[१७३२]=> भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म.

[१७६८]=> एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

[१८२३]=> जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचा जन्म.

[१८५३]=> संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म.

[१८६१]=> कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा जन्म.

[१८७७]=> द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.

[१८९२]=> सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन.

[१८९७]=> परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.

[१९१६]=> गंधर्व भूषण जयराम शिलेदार यांचा जन्म.

[१९१७]=> फिनलँड रशियापासुन स्वतंत्र झाला.

[१९१७]=> बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म.

[१९२३]=> लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचा जन्म.

[१९३२]=> पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म.

[१९४५]=> अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.

[१९४८]=> भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म.

[१९५६]=> भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन.

[१९७१]=> भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन.

[१९७१]=> भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.

[१९७६]=> भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन.

[१९७८]=> स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.

[१९८१]=> डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.

[१९८५]=> भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.

[१९९०]=> मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान तुक़ू अब्दुल रहमान यांचे निधन.

[१९९२]=> अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.

[१९९९]=> जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ऑलिम्पिक ऑर्डर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

[२०००]=> थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हे पण पहा :- केवल प्रयोगी अव्यय

            तुम्हाला  डिसेंबर दिनविशेष | 6 December Dinvishesh | 6 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad