काकड आरती संग्रह | Kakad Aarti Sangrah - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 30, 2023

काकड आरती संग्रह | Kakad Aarti Sangrah

काकड आरती संग्रह

Kakad Aarti Sangrah

काकड आरती संग्रह | Kakad Aarti Sangrah

काकड आरती संग्रह ( Kakad Aarti Sangrah ) :- 

          आपण कोणतेही काम शुभ होण्यासाठी देवाची आराधना करतो व त्यातून आमचे चांगले व निर्विघन होवो अशी प्रार्थना करतो. काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात. अशाच काकड आरती ( Kakad Aarti  ) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या आरती संग्रहात तुम्हाला पुढील आरती मिळतील.


काकड आरती संग्रह

Kakad Aarti Sangrah

अ क्रघटकाचे नाव
भक्तीचिये पोटी बोध काकडा ज्योती
परमात्मया श्रीरघुपती काकड आरती
उठा उठा हो साधक काकड आरती
गणपतीची - काकड आरती
काकड आरती - विठ्ठलाची
काकड आरती - श्रीगुरूदत्त
काकड आरती - श्रीगुरूदत्त

काकड आरती - श्रीगुरूदत्त
काकड आरती - पांडुरंग


भक्तीचिये पोटी बोध काकडा ज्योती

भक्तीचिये पोटी बोध कांकडा ज्योती ।
पंचप्राण जीवेंभावें ओवाळू आरती ।। १ ।।

ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडूनि चरणीं ठेविला माथा ॥ धृ ।।

काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती ।
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ।। २ ।।

राही रखुमाबाई उभ्या दोन्ही दों बाहीं ।
मयूरपिच्छचामरें ढाळिती ठाईंच्या ठाई ।। ३ ।।

विटेसहित पाय म्हणुनी भावें ओवाळूं ।
कोटी रवि शशी दिव्य उगवले हेळू ।। ४ ।।

तुका म्हणे दीप घेउनी उन्मनींत शोभा ।
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा || ५ ||


परमात्मया श्रीरघुपती काकड आरती

काकड आरती परमात्मया श्रीरघुपती ।
जीवशिव ओवाळीन निर्जी निजात्मज्योती ॥ धृ ।।

त्रिगुण काकडा द्वैतघृतं तिंबिला ।
उजळीतों आत्मज्योती तेणें प्रकाशला ॥ काकड ।। १ ।।

काजळी तामस अवघें तेज डळमळ
अवनी आवर अवघा निग निज निश्चळ । काकड || २ ||

उदय ना अस्त जेथें बोध प्रातःकाळीं ।
रामी रामदास सहज सहज ओंवाळी ।। काकड ।। ३ ।।



उठा उठा हो साधक काकड आरती

उठा उठा हो साधक | साधा आपुलालें हित ।।
गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत ।। १ ।।

उठा उठा हो वेगेंसीं । चला जाऊं राऊळासी ।।
हरतिल पातकांच्या राशी । कांकड आरती पाहोनी ।। धृ ।।

उठोनियां हो पाहाटें । पाहा विठ्ठल उभा विटे ।।
चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टीं अवलोका || २ ||

जागें करा रुक्मिणीवरा । देव आहे निजसुरा ।।
वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ।। ३ ।।

पुढें वाजंत्री | ढोल दमामे गर्जती ।।
होत कांकड आरती माझ्या पंढरीरायाची ।। ४ ।।

सिंहनाद शंख भेरी गजर होतो महाद्वारीं ॥
केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥ ५ ॥


गणपतीची - काकड आरती

उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
ऋद्धिसिद्धिंचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ध्रु.॥ ।

अंगी शेंदुराची उटी । माथां शोभतसे कीरिटी ।
केशर कस्तुरी लल्लाटीं । हार कंठी साजिरी ॥१॥

कानीं कुंडलांची प्रभा । सूर्यचंद्र जैसे नभा ।
माजीं नागबंदशोभा । स्मरतां उभा जवळी तो ॥२॥

कांसे पीतांबराची घटी। हाती मोदकाची वाटी ।
रामानंद स्मरतां कंठीं । तो संकटीं पावतो ॥ ३ ॥


काकड आरती - विठ्ठलाची

हाटाचे तातडी दामा शिंपी गेला |
नैवेद्य पाठविला | नाम्यासंगे ||

नैवेद्य घेऊनि राऊळासि गेला |
हाका मारी त्याला | 'विठ्या' 'विठ्या' ||

नाम्याने नैवेद्य कुंचीखाली झाकिला |
आणुनी ठेविला | देवापुढे ||

नाही अमंगळ | नाही हो ओंगळ |
केली मी आंघोळ | चंद्रभागे ||

ऊठ झडकरी जेवी लवकरी |
माता माझी घरी वाट पाहे ||

नेणता म्हणोनी का रे जेविनासी |
करीन प्राणासी घात माझ्या ||

पाषाणाची मूर्ती कापे थराथरा |
जेवी भराभरा नाम्यासंगे ||

पाषाणाची मूर्ती नाम्यासंगे जेविली |
जगी कीर्ती झाली जनी म्हणे ||

नामा म्हणे माझी वडिलांची ठेव |
उभा आहे देव विटेवरी ||



काकड आरती - श्रीगुरूदत्त

काकडे आरती दत्ता तुजला ओवाळूं ।
प्रेमभावें तुझे चरण हृदयीं कवळूं ॥ध्रु०॥

माया अविद्या एकत्र वळुनी काकडा केला ।
स्वरुपानुस्मरणें स्नेहामाजी भिजवीला ॥१॥

विवेकज्ञानाग्नि ज्वाळेवरि सहसा पाजळिला ।
पेटुनियां झगझगीत उजेड हा पडला ॥२॥

द्वैत ध्वांता समूळ ग्रासुनि मनोन्मनी शोभा ।
फांकली तेव्हां पळत सुटे कामादिक शलभा ॥३॥

धावुनि आपोआप येती कामादिक शलभ ।
जळती ज्यांचा अंत योगियां दुर्लभ ॥४॥

काकडे आरती ऐशी उजलूं सोज्वळ ।


काकड आरती - श्रीगुरूदत्त

पंचप्राण काकड आरती तत्त्वात्मक ज्योती ।
लावुनि तत्त्वात्मक ज्योती ।
ओवाळिला श्री त्रयमूर्तिं परमात्मा प्रीती ॥ध्रु०॥

ओवाळूं आरती माझ्या सद्‌गुरुनाथा ।
स्वामी श्रीगुरुनाथा । शरण मी आलो तुज ।
शरण मी आलो तुज । श्री पदीं ठेवियला माथा ॥१॥

कृष्णा सुपंचगंगा अनादि संगमीं ।
राहे यतिवर तरुतळीं । तो हा माझा कुलस्वामी । ओवाळूं०॥२॥

द्वारीं चौघडा वाजे वाजंत्री वाजती ।
कर्णे वाजंत्री वाजती। नाना घोषें गर्जत ।
नाना वाद्यें गर्जत । भक्त स्वानंदें स्तविती ॥ओवाळूं ॥३॥

इंद्रादि सुरवर पन्नग दर्शनास येती। श्रीचे दर्शनास येती ।
नारद मुनिवर किंन्नर तुंबर आळविती ॥ओवाळूं॥४॥

पाहुनि सिंहासनीं आदि मूर्ति सांवळी ।
चिन्मय मूर्ति सांवळी । श्रीगुरुभक्त तन्मय ।
श्रीगुरुभक्त निर्भय श्रीपदीं ओवाळी ॥ओवाळूं॥५॥


काकड आरती - श्रीगुरूदत्त

श्रीगुरुदत्ता कांकड आरती ओवाळित आतां ।
तुजला ओवाळित आतां ।
भावें ओवाळित आतां ।
निद्रातीत जागृत असतां न येचि उठवितां ॥ध्रु०॥

माया वस्त्रांतुनि हे चिंधी सांपडली मजला ।
नरतनु सांपउली मजला ।
अवचित सांपडली मजला ।
वाया न जाऊं द्यावी म्हणुनी काकडा केला ॥१॥

विद्या अविद्या द्वैत उठतां त्रिपुटी उद्‌भवली ।
मायिक त्रिपुटी उद्‌भवली ।
सद्वस्तूचें स्मरणहि नसतां पीळ पडुनि गेली ॥२॥

मोहरुपें स्नेंहांत बुडवुनि ज्योती लावियली ।
स्वयंज्योती लावियली । परंज्योती लावियली ।
पाहुनि सद्‌गुरु बाबा राम म्हणे निशा सरली ॥३॥


काकड आरती - पांडुरंग

उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां ।
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ॥१॥

संत साधु मुनि अवधे झालेती गोळा ।
सोडा शेजमुख आतां पाहूं द्या मुखकमळा ॥२॥

रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी ।
मन उतावेळ रुप पाहावया दृष्टीं ॥३॥

राई रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया ।
सेजें हालवुनी जागें करा देवराया ॥४॥

गरुड हनुमंत उभे पाहाती वाट ।
स्वर्गींचे सुरवर घेउनी आले बोभाट ॥५॥

झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।


          तुम्हाला काकड आरती संग्रह | Kakad Aarti Sangrah ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad