कृषि दिन | Krushi Din | Krishi Din | Agriculture Day - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 26, 2023

कृषि दिन | Krushi Din | Krishi Din | Agriculture Day

कृषि दिन

Krushi Din | Krishi Din

Agriculture Day

कृषि दिन | Krushi Din | Krishi Din | Agriculture Day

            कृषि दिन | Krushi Din | Krishi Din | Agriculture Day हा हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै या दिवशी साजरा केला जातो. कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.


            भारत हा कृषिप्रधान देश आहे असे म्हटले जाते. कारण अजूनही भारतात बहुसंख्य लोक आपली उपजीविका शेतीवरच करत आहेत. भारत स्वतःच शेत असणे अजूनही अभिमानाची बाबा मानली जाते. येथील लोकांचे मत असे आहे की दुसर्याच्या हाताखाली नोकर बनून नोकरी करण्यापेक्षा स्वतः च्या शेतावर मालक बनून राहू. शेतकरी स्वतः शेतात राबून अख्या जगाचे पोट भरतो म्हणूनच तर त्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. अशा या जागच्या पोशिंद्याचे उपकाराचे फेडण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु हा दिवस १ जुलै रोजीच का साजरा केला जातो त्या मागे ही एक कारण आहे ते म्हणजे १ जुलै रोजी भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या सुविख्यात कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती असते म्हणून १ जुलै रोजी "कृषी दिन" साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित घेतला होता. कृषी दिन हा कृषिप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. याबरोबरच या दिवशी 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केल्या जाते.


            वसंतराव नाईक हे शेतकऱ्यांचे कैवारी व शेतीवर निस्सीम भक्ती असणारे मुख्यमंत्री होते. ते नेहमी म्हणायचे कि, "मी मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर जरी बसून असलो तरीदेखील माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असतो." हा 'वसंतविचार' लक्षात घेता शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व शेतकऱ्याना आत्मबळ देण्यासाठी प्रसिद्ध विचारवंत एकनाथ पवार यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रूजवली. कृृृषीप्रधान देेेशात पहिल्यांदाच 'थेट बांधावर' वसंतराव नाईक यांचे कृषीमंत्र , शेतकरी कृतज्ञतेचा संदेश व आत्मबळ देणारी ही अभिनव मोहीम नावारूपास आली. आज कृषी दिन हा कार्यालयाबरोबरच थेट बांधापर्यंत सर्वत्र साजरा होतो. इतर राज्यात देखील एक जुलैला कृषी दिन साजरा होतांना दिसून येते. 


            वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. १९७२ सारख्या भिषण दुष्काळातही वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी 'शेतकरी आत्महत्या' हा शब्द देखील गवसला नव्हता.शेतकऱ्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. "शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अन् शेतकऱ्यांचे मुलं कलेक्टर झाली पाहिजे." हे वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. थेट बांधावर आधुनिक कृषीतंत्रे व दूरगामी उपाययोजनांची अमलबजावणी याबरोबरच नव्या पिढीत शेती , शेतकऱ्याप्रति जिव्हाळा निर्माण केल्यास नाईकसाहेबांचे स्वप्ने पुर्णत्वास येऊ शकते.


          तुम्हाला कृषि दिन | Krushi Din | Krishi Din | Agriculture Day ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad