१ फेब्रुवारी दिनविशेष
1 February Dinvishesh
1 February day special in Marathi
१ फेब्रुवारी दिनविशेष ( 1 February Dinvishesh | 1 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १ फेब्रुवारी दिनविशेष ( 1 February Dinvishesh | 1 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१ फेब्रुवारी दिनविशेष
1 February Dinvishesh
1 February day special in Marathi
[१६८९]=> गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
[१८३५]=> मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत
[१८६४]=> अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म
[१८८४]=> ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
[१८८४]=> महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचा जन्म
[१८९३]=> थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.
[१९०१]=> अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचा जन्म.
[१९१२]=> संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार राजा बढे यांचा जन्म.
[१९१७]=> चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचा जन्म.
[१९२७]=> ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचा जन्म.
[१९२९]=> ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक जयंत साळगावकर यांचा जन्म.
[१९३१]=> रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचा जन्म.
[१९४१]=> डॉ. के. बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.
[१९४६]=> नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.
[१९५६]=> सुधी रंजन दास यांनी भारताचे ५वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
[१९६०]=> अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा जन्म.
[१९६४]=> प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
[१९६६]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
[१९७१]=> क्रिकेटपटू अजय जडेजा यांचा जन्म.
[१९७६]=> क्वांटम मॅकॅनिक्स मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचे निधन.
[१९७७]=> भारतीय तटरक्षक दलाची अधिकृतपणे स्थापना झाली.
[१९७९]=> १५वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.
[१९८१]=> ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर
[१९८१]=> डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे संस्थापक डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर यांचे निधन.
[१९८२]=> पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा जन्म.
[१९९२]=> भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अॅंडरसन याला फरारी घोषित केले.
[१९९५]=> नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर यांचे निधन.
[२००३]=> अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी.
[२००३]=> भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचे निधन.
[२००४]=> मक्का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.
[२०१२]=> संगीतकार व संगीत संयोजक अनिल मोहिले यांचे निधन.
[२०१३]=> जागतिक बुरखा/हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.
हे पण पहा :-सामासिक शब्द
तुम्हाला १ फेब्रुवारी दिनविशेष | 1 February Dinvishesh | 1 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box