१ जून दिनविशेष | 1 June Dinvishesh | 1 June day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 31, 2024

१ जून दिनविशेष | 1 June Dinvishesh | 1 June day special in Marathi

१ जून दिनविशेष

1 June Dinvishesh

1 June day special in Marathi

१ जून दिनविशेष | 1 June Dinvishesh | 1 June day special in Marathi

            १ जून दिनविशेष ( 1 June Dinvishesh | 1 June day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १ जून दिनविशेष ( 1 June Dinvishesh | 1 June day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१ जून दिनविशेष

1 June Dinvishesh

1 June day special in Marathi


@ जागतिक दूध दिवस [World Milk Day]

@ जागतिक पालक दिवस [Global Day of Parents]


[१७९२]=> केंटुकी अमेरिकेचे १५वे राज्य बनले.

[१७९६]=> टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य बनले.

[१८३०]=> भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचे निधन.

[१८३१]=> सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.

[१८४२]=> पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म.

[१८४३]=> फिंगरप्रिंटिंग चे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म.

[१८६८]=> अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचे निधन.

[१८७२]=> न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक जेम्स गॉर्डन बेनेट यांचे निधन.

[१८७२]=> मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांचा जन्म.

[१९०७]=> जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचा जन्म.

[१९२६]=> अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांचा जन्म.

[१९२९]=> विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली.

[१९२९]=> हिन्दी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशिद ऊर्फ नर्गिस दत्त यांचा जन्म.

[१९३०]=> मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.

[१९३४]=> प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांचे निधन.

[१९४४]=> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे निधन.

[१९४५]=> टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.

[१९४७]=> मॅक्लारेन ग्रुप चे संस्थापक रॉन डेनिस यांचा जन्म.

[१९५९]=> द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.

[१९६०]=> जर्मन-ऑस्ट्रियन बहीण पॉड हिटलर यांचे निधन.


[१९६१]=> अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.

[१९६२]=> दुसर्‍या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्‍या अ‍ॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.

[१९६५]=> इंग्लिश बुद्धिबळपटू नायगेल शॉर्ट यांचा जन्म.

[१९६८]=> अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचे निधन.

[१९७०]=> हिंदी चित्रपट अभिनेता आर. माधवन यांचा जन्म.

[१९८४]=> हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन.

[१९८५]=> भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म.

[१९८७]=> दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के.ए. अब्बास यांचे निधन.

[१९९६]=> भारताचे ११वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.

[१९९६]=> भारताचे ६वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलमसंजीव रेड्डी यांचे निधन.

[१९९८]=> ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे निधन.

[१९९९]=> होव्हर्क्राफ्ट चे निर्माते शोध ख्रिस्तोफर कॉकेरेल यांचे निधन.

[२०००]=> एकपात्री कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचे निधन.

[२००१]=> नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.

[२००२]=> दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन.

[२००३]=> चीन मधील महाप्रचंड थ्री गॉर्जेस धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.

[२००४]=> रमेशचंद्र लाहोटी भारताचे ३५वे सरन्यायाधीश यांनी सूत्रे हाती घेतली.

[२००६]=> लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचे निधन.


            तुम्हाला १ जून दिनविशेष | 1 June Dinvishesh | 1 June day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad