१२ जानेवारी दिनविशेष | 12 January Dinvishesh | 12 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 11, 2024

१२ जानेवारी दिनविशेष | 12 January Dinvishesh | 12 January day special in Marathi

१२ जानेवारी दिनविशेष

12 January Dinvishesh

12 January day special in Marathi

१२ जानेवारी दिनविशेष | 12 January Dinvishesh | 12 January day special in Marathi

            १२ जानेवारी दिनविशेष ( 12 January Dinvishesh | 12 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १२ जानेवारी दिनविशेष ( 12 January Dinvishesh | 12 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१२ जानेवारी दिनविशेष

12 January Dinvishesh

12 January day special in Marathi


@ राष्ट्रीय युवा दिन [ National Youth Day]

[१५९८]=> राजमाता जिजाऊ यांचा जन्म.

[१७०५]=> सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.

[१८५४]=> विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म.

[१८६३]=> भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म.

[१८९३]=> जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचा जन्म.

[१८९९]=> नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचा जन्म.

[१९०२]=> महर्षी न्यायरत्न धोंडीराजशास्त्री विनोद यांचा जन्म.

[१९०६]=> भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म.

[१९१५]=> महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.

[१९१७]=> महर्षी महेश योगी यांचा जन्म.

[१९१८]=> ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांचा जन्म.


[१९३१]=> सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.

[१९३६]=> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.

[१९४४]=> लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन.

[१९६६]=> स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचे निधन.

[१९७६]=> इंग्लिश रहस्यकथालेखिका अॅगाथा ख्रिस्ती यांचे निधन.

[१९९२]=> शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचे निधन.

[१९९७]=> सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.

[१९९७]=> हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते ओ. पी. रल्हन यांचे निधन.

[२००५]=> ज्येष्ठ हिंदी चित्रपट कलावंत अमरीश पुरी यांचे निधन.

[२००५]=> राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.

[२००६]=> हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू.


हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला १२ जानेवारी दिनविशेष | 12 January Dinvishesh | 12 January day special in Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad