१३ जानेवारी दिनविशेष | 13 January Dinvishesh | 13 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 12, 2024

१३ जानेवारी दिनविशेष | 13 January Dinvishesh | 13 January day special in Marathi

१३ जानेवारी दिनविशेष

13 January Dinvishesh

13 January day special in Marathi

१३ जानेवारी दिनविशेष | 13 January Dinvishesh | 13 January day special in Marathi

            १३ जानेवारी दिनविशेष ( 13 January Dinvishesh | 13 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १३ जानेवारी दिनविशेष ( 13 January Dinvishesh | 13 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१३ जानेवारी दिनविशेष

13 January Dinvishesh

13 January day special in Marathi


आंतरराष्ट्रीय संशयवादी दिवस [ International Skeptics Day]

[१६१०]=> गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.

[१८३२]=> लॉर्डस या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचे निधन.

[१८८९]=> नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

[१९१५]=> इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.

[१९१९]=> आंध्रप्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचा जन्म.

[१९२६]=> हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते शक्ती सामंत यांचा जन्म.

[१९३०]=> मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.

[१९३८]=> प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म.

[१९४८]=> जोधपूरचे राजा गज सिंघ यांचा जन्म.

[१९४९]=> भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म.

[१९५३]=> मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.

[१९५७]=> हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.

[१९६४]=> कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.


[१९६७]=> पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.

[१९७६]=> सुप्रसिद्ध तबलावादक अहमद जाँ. थिरकवा यांचे निधन.

[१९८२]=> पाकिस्तानी क्रिकेटपटू कमरान अकमल यांचा जन्म.

[१९८३]=> भारतीय चित्रपट अभिनेता इम्रान खान यांचा जन्म.

[१९८५]=> हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मदन पुरी यांचे निधन.

[१९९६]=> पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेसहि रेल्वेगाडी सुरु झाली.

[१९९७]=> उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचे निधन.

[१९९८]=> संगीत दिगदर्शक आणि नृत्य दिगदर्शक शंभू सेन यांचे निधन.

[२००१]=> संस्कृत पंडित आणि लेखक श्रीधर गणेश दाढे यांचे निधन.

[२००७]=> के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[२०११]=> ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन.

[२०१३]=> क्रिकेटपटू रुसी सुरती यांचे निधन.



            तुम्हाला १३ जानेवारी दिनविशेष | 13 January Dinvishesh | 13 January day special in Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad