१४ जानेवारी दिनविशेष
14 January Dinvishesh
14 January day special in Marathi
१४ जानेवारी दिनविशेष ( 14 January Dinvishesh | 14 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १४ जानेवारी दिनविशेष ( 14 January Dinvishesh | 14 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१४ जानेवारी दिनविशेष
14 January Dinvishesh
14 January day special in Marathi
[१७४२]=> धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचे निधन.
[१७६१]=> पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचे निधन.
[१७६१]=> पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन.
[१७६१]=> मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.
[१८८२]=> संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणावर काम करणारे कृतीशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म.
[१८८३]=> जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचा जन्म.
[१८९२]=> भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म.
[१८९६]=> भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा जन्म.
[१८९८]=> इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन.
[१९०५]=> मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म.
[१९०८]=> ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.
[१९१९]=> गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचा जन्म.
[१९२०]=> डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन.
[१९२३]=> अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म.
[१९२३]=> विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
[१९२६]=> ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म.
[१९३१]=> ऊर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचा जन्म.
[१९४८]=> लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
[१९७७]=> भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन यांचा जन्म.
[१९९१]=> संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचे निधन.
[१९९४]=> मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
[१९९८]=> ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.
[२०००]=> ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
[२००१]=> माहितीपट निर्माते फली बिलिमोरिया यांचे निधन.
हे पण पहा :- योगासांचे प्रकार
तुम्हाला १४ जानेवारी दिनविशेष | 14 January Dinvishesh | 14 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box