१५ जानेवारी दिनविशेष
15 January Dinvishesh
15 January day special in Marathi
१५ जानेवारी दिनविशेष ( 15 January Dinvishesh | 15 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १५ जानेवारी दिनविशेष ( 15 January Dinvishesh | 15 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१५ जानेवारी दिनविशेष
15 January Dinvishesh
15 January day special in Marathi
@ भारतीय सैन्य दिन [ Indian Army Day]
[१५५९]=> राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक झाला.
[१७६१]=> पानिपतचे तिसरे युद्ध संपले.
[१७७९]=> ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईचे एक संस्थापक रॉबर्ट ग्रँट यांचा जन्म.
[१८६१]=> एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.
[१८८९]=> द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.
[१९२०]=> कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचा जन्म.
[१९२१]=> महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म.
[१९२६]=> भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म.
[१९२९]=> गांधीवादी नेते आणि नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म.
[१९३१]=> मराठीह कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म.
[१९४७]=> पत्रकार नितीश नंदी यांचा जन्म.
[१९४९]=> जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
[१९५६]=> बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा जन्म.
[१९७०]=> मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.
[१९७१]=> अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचे निधन.
[१९७३]=> जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
[१९९४]=> गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी हरिलाल उपाध्याय यांचे निधन.
[१९९६]=> भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.
[१९९८]=> भारताचे दुसरे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांचे निधन.
[१९९९]=> गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
[२००१]=> सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.
[२००२]=> राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांचे निधन.
[२०१३]=> समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचे निधन.
[२०१४]=> दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे निधन.
हे पण पहा :- संख्यांचे प्रकार
तुम्हाला १५ जानेवारी दिनविशेष | 15 January Dinvishesh | 15 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box