१६ फेब्रुवारी दिनविशेष | 16 February Dinvishesh | 16 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 15, 2024

१६ फेब्रुवारी दिनविशेष | 16 February Dinvishesh | 16 February day special in Marathi

१६ फेब्रुवारी दिनविशेष

16 February Dinvishesh

16 February day special in Marathi

१६ फेब्रुवारी दिनविशेष | 16 February Dinvishesh | 16 February day special in Marathi

            १६ फेब्रुवारी दिनविशेष ( 16 February Dinvishesh | 16 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १६ फेब्रुवारी दिनविशेष ( 16 February Dinvishesh | 16 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१६ फेब्रुवारी दिनविशेष

16 February Dinvishesh

16 February day special in Marathi


[१२२२]=> जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म.

[१६५९]=> पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.

[१७०४]=> औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले.

[१८२२]=> बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म.

[१८७६]=> भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म.

[१९०९]=> मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचा जन्म.

[१९१८]=> लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.

[१९४४]=> भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन.

[१९५४]=> वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांचा जन्म.

[१९५६]=> खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ साहा यांचे निधन.


[१९५९]=> फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदी रुजू झाले.

[१९६०]=> अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटन ने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान केले.

[१९६४]=> ब्राझीलचा फुटबॉलपटू बेबेटो यांचा जन्म.

[१९६८]=> कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन.

[१९७८]=> भारतीय क्रिकेटपटू वासिम जाफर यांचा जन्म.

[१९८५]=> लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लीम संघटनेची स्थापना झाली.

[१९९४]=> जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचे निधन.

[१९९६]=> उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक आर. डी. आगा यांचे निधन.

[२०००]=> सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ बेल्लारी शामण्णा केशवान यांचे निधन.

[२००१]=> मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन.


            तुम्हाला १६ फेब्रुवारी दिनविशेष | 16 February Dinvishesh | 16 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad