१६ जानेवारी दिनविशेष
16 January Dinvishesh
16 January day special in Marathi
१६ जानेवारी दिनविशेष ( 16 January Dinvishesh | 16 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १६ जानेवारी दिनविशेष ( 16 January Dinvishesh | 16 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१६ जानेवारी दिनविशेष
16 January Dinvishesh
16 January day special in Marathi
[१६६०]=> रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
[१६६६]=> नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला.
[१६६७]=> अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचे निधन.
[१६८१]=> छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.
[१८५३]=> मिचेलीन टायर्स कंपनी चे संस्थापक फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचा जन्म.
[१९०५]=> लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.
[१९०९]=> समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन.
[१९२०]=> अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.
[१९२०]=> कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचा जन्म.
[१९२६]=> संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचा जन्म.
[१९३८]=> बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन.
[१९४१]=> नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण.
[१९४६]=> चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांचा जन्म.
[१९५४]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन.
[१९५५]=> पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.
[१९६६]=> आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचे निधन.
[१९७८]=> रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द.
[१९७९]=> शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
[१९८८]=> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन.
[१९९५]=> आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण
झाले.
[१९९६]=> पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.
[१९९७]=> कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या.
[१९९८]=> ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
[२०००]=> मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत त्रिलोकीनाथ कौल यांचे निधन.
[२००३]=> सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक रामविलास जगन्नाथ राठी यांचे निधन.
[२००५]=> संगीतकार, पेटीवाले मेहेंदळे उर्फ श्रीकृष्ण हरी मेहेंदळे यांचे निधन.
[२००८]=> टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण.
हे पण पहा :- विभाज्यतेच्या कसोट्या
तुम्हाला १६ जानेवारी दिनविशेष | 16 January Dinvishesh | 16 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box