१८ जानेवारी दिनविशेष | 18 January Dinvishesh | 18 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 17, 2024

१८ जानेवारी दिनविशेष | 18 January Dinvishesh | 18 January day special in Marathi

१८ जानेवारी दिनविशेष

18 January Dinvishesh

18 January day special in Marathi

१८ जानेवारी दिनविशेष | 18 January Dinvishesh | 18 January day special in Marathi

            १८ जानेवारी दिनविशेष ( 18 January Dinvishesh | 18 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १८ जानेवारी दिनविशेष ( 18 January Dinvishesh | 18 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१८ जानेवारी दिनविशेष

18 January Dinvishesh

18 January day special in Marathi

@ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर. [ Bharat Ratna Award announced to Economist Amartya Sen.]

[१७७८]=> कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.

[१७९३]=> महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन.

[१८३३]=> अमेरिकन संशोधक रे डॉल्बी यांचा जन्म.

[१८४२]=> न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म.

[१८५४]=> अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वॉटसन यांचा जन्म.

[१८८९]=> कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचा जन्म.

[१८८९]=> नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांचा जन्म.

[१८९२]=> अमेरिकन अभिनेता ऑलिव्हर हार्डी यांचा जन्म.

[१९११]=> युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.

[१९३३]=> भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचा जन्म.

[१९३६]=> नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे निधन.

[१९४७]=> भारतीय अभिनेता आणि गायक के. एल. सैगल उर्फ कुंदनलाल सैगल यांचे निधन.

[१९५२]=> चंदन तस्कर वीरप्पन यांचा जन्म.

[१९५६]=> संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, 
दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला.


[१९६४]=> न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.

[१९६६]=> रशियन बुद्धिबळपटू अलेक्झांडर खलिफमान यांचा जन्म.

[१९६७]=> कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.

[१९७१]=> भारीतय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.

[१९७२]=> भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचा जन्म.

[१९७४]=> इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.

[१९९३]=> कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचे निधन.

[१९९५]=> साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.

[१९९६]=> अभिनेते आणि राजकीय नेते एन. टी. रामाराव यांचे निधन.

[१९९७]=> नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.

[१९९८]=> मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[१९९९]=> नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

[२००३]=> हिंदी साहित्यिक आणि कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन.

[२००५]=> एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.


हे पण पहा :- वर्ग व वर्गमूळ

            तुम्हाला १८ जानेवारी दिनविशेष | 18 January Dinvishesh | 18 January day special in Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad