१९ फेब्रुवारी दिनविशेष
19 February Dinvishesh
19 February day special in Marathi
१९ फेब्रुवारी दिनविशेष ( 19 February Dinvishesh | 19 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १९ फेब्रुवारी दिनविशेष ( 19 February Dinvishesh | 19 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१९ फेब्रुवारी दिनविशेष
19 February Dinvishesh
19 February day special in Marathi
@ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती [ Birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj ]
[१४७३]=> सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म.
[१६३०]=> छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म.
[१८१८]=> पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन.
[१८५९]=> स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज स्वांते अर्हेनिअस यांचा जन्म.
[१८७८]=> थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले.
[१८८४]=> यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.
[१८९९]=> गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म.
[१९०६]=> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म.
[१९१५]=> थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन.
[१९१९]=> मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचा जन्म.
[१९२२]=> पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचा जन्म.
[१९४२]=> पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या.
[१९५६]=> ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत केशव लक्ष्मण दफ्तरी यांचे निधन.
[१९५६]=> प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य नरेन्द्र देव यांचे निधन.
[१९६२]=> झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हॅना मंडलिकोव्हा यांचा जन्म.
[१९७८]=> गायक व संगीतकार पंकज मलिक यांचे निधन.
[१९९७]=> संगीतकार राम कदम यांचे निधन.
[१९९७]=> सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचे निधन.
[२००३]=> तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
[२००३]=> पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते अनंत मराठे यांचे निधन.
हे पण पहा :- भारतातील शासक व त्यांचा शासन काळ
तुम्हाला १९ फेब्रुवारी दिनविशेष | 19 February Dinvishesh | 19 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box