१९ जानेवारी दिनविशेष | 19 January Dinvishesh | 19 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 18, 2024

१९ जानेवारी दिनविशेष | 19 January Dinvishesh | 19 January day special in Marathi

१९ जानेवारी दिनविशेष

19 January Dinvishesh

19 January day special in Marathi

१९ जानेवारी दिनविशेष | 19 January Dinvishesh | 19 January day special in Marathi

            १९ जानेवारी दिनविशेष ( 19 January Dinvishesh | 19 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १९ जानेवारी दिनविशेष ( 19 January Dinvishesh | 19 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१९ जानेवारी दिनविशेष

19 January Dinvishesh

19 January day special in Marathi


[१७३६]=> वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.

[१८०९]=>
अमेरिकन गूढ व भयकथांचे लेखक व कवी एडगर अॅलन पो यांचा जन्म.

[१८३९]=> ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.

[१८८६]=> हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म.

[१८९२]=> विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म.

[१८९८]=> मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा जन्म.

[१९०३]=> अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.

[१९०५]=> देबेन्द्रनाथ टागोर - भारतीय तत्त्वज्ञानी यांचा मृत्यू.

[१९०६]=> चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म.

[१९२०]=> संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस झेवियर पेरेझ द कुइयार यांचा जन्म.

[१९३६]=> बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांचा जन्म.

[१९४२]=> दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.

[१९४९]=> क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.



[१९४९]=> पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.

[१९५४]=> कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.

[१९५६]=> देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.

[१९६६]=> भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.

[१९६८]=> पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.

[१९७८]=> बिजोन भट्टाचार्य - भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक यांचा मृत्यू.

[१९८६]=> (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.

[१९९६]=> ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.

[१९९६]=> प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.

[२०००]=> एम. ए. चिदंबरम - भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक यांचा मृत्यू.

[२००६]=> नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.

[२००७]=> सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.

[२०२०]=> शिन क्युकहो - दक्षिण कोरियनजपानी व्यापारी, लोटे ग्रुपचे संस्थापक यांचा मृत्यू.



            तुम्हाला १९ जानेवारी दिनविशेष | 19 January Dinvishesh | 19 January day special in Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad