२ फेब्रुवारी दिनविशेष | 2 February Dinvishesh | 2 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 1, 2024

२ फेब्रुवारी दिनविशेष | 2 February Dinvishesh | 2 February day special in Marathi

२ फेब्रुवारी दिनविशेष

2 February Dinvishesh

2 February day special in Marathi

२ फेब्रुवारी दिनविशेष | 2 February Dinvishesh | 2 February day special in Marathi

            २ फेब्रुवारी दिनविशेष ( 2 February Dinvishesh | 2 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २ फेब्रुवारी दिनविशेष ( 2 February Dinvishesh | 2 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२ फेब्रुवारी दिनविशेष

2 February Dinvishesh

2 February day special in Marathi


@ संधिवात जागृती दिन [Rheumatoid Arthritis Awareness Day]

@ जागतिक पाणथळ भूमी दिवस [ World Wetlands Day ]

[१५५७]=> गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.

[१७५४]=> फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड यांचा जन्म.

[१८४८]=> कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

[१८५६]=> स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म.

[१८८४]=> ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म.

[१८९७]=> हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचा जन्म.

[१९०५]=> जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचा जन्म.

[१९०७]=> रशियन रसायनशास्त्रज दिमित्री मेंदेलिएव्ह याचं निधन.

[१९१७]=> लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला.


[१९२२]=> भारतीय फील्ड हॉकीपटू कुंवर दिग्विजय सिंग यांचा जन्म.

[१९२३]=> केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म.

[१९३०]=> लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन.

[१९३३]=> अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.

[१९४३]=> दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.

[१९६२]=> ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.

[१९७०]=> ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल याचं निधन.

[१९७१]=> इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.

[१९७१]=> इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला

[१९७९]=> भिनेत्री शमिता शेट्टी यांचा जन्म.

[१९८७]=> स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन याचं निधन.

[२००७]=> हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा याचं निधन.


हे पण पहा :- विशेषण

            तुम्हाला २ फेब्रुवारी दिनविशेष | 2 February Dinvishesh | 2 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad