२० जानेवारी दिनविशेष | 20 January Dinvishesh | 20 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 19, 2024

२० जानेवारी दिनविशेष | 20 January Dinvishesh | 20 January day special in Marathi

२० जानेवारी दिनविशेष

20 January Dinvishesh

20 January day special in Marathi

२० जानेवारी दिनविशेष | 20 January Dinvishesh | 20 January day special in Marathi

            २० जानेवारी दिनविशेष ( 20 January Dinvishesh | 20 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २० जानेवारी दिनविशेष ( 20 January Dinvishesh | 20 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२० जानेवारी दिनविशेष

20 January Dinvishesh

20 January day special in Marathi


[१७७५]=> फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे-मरी अॅम्पियर यांचा जन्म.

[१७८८]=> इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.

[१८४१]=> युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.

[१८६१]=> मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.

[१८७१]=> टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमसेटजी टाटा यांचा जन्म.

[१८८९]=> महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.

[१८९१]=> हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचे निधन.

[१८९८]=> नात मास्टर आणि गायक कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म.

[१९३०]=> चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.

[१९३६]=> युनायटेड किंगडमचा राजा जॉर्ज पाचवा यांचे निधन.

[१९३७]=> फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.


[१९४४]=> दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.

[१९४८]=> महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला.

[१९५१]=> समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचे निधन.

[१९५७]=> आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.

[१९६०]=> १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक आपा शेर्पा यांचा जन्म.

[१९६३]=> चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.

[१९६९]=> क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.

[१९८०]=> दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई यांचे निधन.

[१९८८]=> स्वातंत्र्यसैनिक आणि पश्तून नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांचे निधन.

[१९९३]=> अँग्लो-डच अभिनेत्री आँड्रे हेपबर्न यांचे निधन.

[१९९८]=> संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर.

[१९९९]=> गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

[२००२]=> रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचे निधन.

[२००९]=> अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.



            तुम्हाला २० जानेवारी दिनविशेष | 20 January Dinvishesh | 20 January day special in Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad