२१ जानेवारी दिनविशेष
21 January Dinvishesh
21 January day special in Marathi
२१ जानेवारी दिनविशेष ( 21 January Dinvishesh | 21 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २१ जानेवारी दिनविशेष ( 21 January Dinvishesh | 21 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२१ जानेवारी दिनविशेष
21 January Dinvishesh
21 January day special in Marathi
[१७९३]=> फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचे निधन.
[१७९३]=> राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.
[१८०५]=> होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
[१८४६]=> डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.
[१८८२]=> कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचा जन्म.
[१८९४]=> कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म.
[१९०१]=> वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचे निधन.
[१९१०]=> गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म.
[१९२४]=> माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते प्रा. मधु दंडवते यांचा जन्म.
[१९२४]=> रशियन क्रांतिकारक व्लादिमिर लेनिन यांचे निधन.
[१९४३]=> क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली.
[१९४५]=> क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे टोकियो जपान येथे निधन.
[१९५०]=> इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल यांचे निधन.
[१९५३]=> मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक पॉल अॅलन यांचा जन्म.
[१९५९]=> दिगदर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते सेसिल बी. डी. मिल यांचे निधन.
[१९६१]=> इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट.
[१९६५]=> अभिनेत्री हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली यांचे निधन.
[१९७२]=> मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
[१९९८]=> भारताचे ९ वे नौदल प्रमुख सुरेन्द्रनाथ कोहली यांचे निधन.
[२०००]=> फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
हे पण पहा :- जगप्रसिद्ध महाकवी व त्यांची लेखनाची भाषा
तुम्हाला २१ जानेवारी दिनविशेष | 21 January Dinvishesh | 21 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box