२२ फेब्रुवारी दिनविशेष | 22 February Dinvishesh | 22 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 21, 2024

२२ फेब्रुवारी दिनविशेष | 22 February Dinvishesh | 22 February day special in Marathi

२२ फेब्रुवारी दिनविशेष

22 February Dinvishesh

22 February day special in Marathi

२२ फेब्रुवारी दिनविशेष | 22 February Dinvishesh | 22 February day special in Marathi

            २२ फेब्रुवारी दिनविशेष ( 22 February Dinvishesh | 22 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २२ फेब्रुवारी दिनविशेष ( 22 February Dinvishesh | 22 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२२ फेब्रुवारी दिनविशेष

22 February Dinvishesh

22 February day special in Marathi


@ लॉर्ड बॅडेन पॉवेल यांची जयंती [ Birth Anniversary of Lord Baden Powell ]

[१७३२]=> अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म.

[१८१५]=> हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन.

[१८१९]=> स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.

[१८२७]=> चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचे निधन.

[१८३६]=> महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म.

[१८५७]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचा जन्म.

[१८५७]=> बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म.

[१९०२]=> जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचा जन्म.

[१९२०]=> चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचा जन्म.

[१९२२]=> व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचा जन्म.

[१९२५]=> ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन.


[१९४२]=> दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

[१९४४]=> कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन.

[१९४८]=> झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.

[१९५८]=> इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.

[१९५८]=> स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन.

[१९६४]=> मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म.

[१९७५]=> अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता ड्रिव बॅरीमोर यांचा जन्म

[१९७८]=> श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[१९७९]=> सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.

[१९८२]=> ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचे निधन.

[२०००]=> प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचे निधन.

[२०००]=> लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन.

[२००९]=> लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन.

हे पण पहा :- मराठी बोधकथा

            तुम्हाला २२ फेब्रुवारी दिनविशेष | 22 February Dinvishesh | 22 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad