२२ जानेवारी दिनविशेष
22 January Dinvishesh
22 January day special in Marathi
२२ जानेवारी दिनविशेष ( 22 January Dinvishesh | 22 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २२ जानेवारी दिनविशेष ( 22 January Dinvishesh | 22 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२२ जानेवारी दिनविशेष
22 January Dinvishesh
22 January day special in Marathi
[१५६१]=> इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचा जन्म.
[१६६६]=> ५ वे मुघल सम्राट शहाजहान यांचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन.
[१६८२]=> समर्थ रामदास स्वामी यांचे निधन.
[१७९९]=> ऑस्ट्रीयन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे यांचे निधन.
[१८९६]=> कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.
[१८९९]=> हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
[१९०१]=> ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचे निधन.
[१९०१]=> भारतीय मानवशास्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म.
[१९०१]=> राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.
[१९०९]=> संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस यू. थांट यांचा जन्म.
[१९११]=> मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.
[१९१६]=> गुजराथी लेखक आणि कवी हरीलाल उपाध्याय यांचा जन्म.
[१९१६]=> बंगाली आणि हिंदी चित्रपट दिगदर्शक आणि पटकथा लेखक सत्येन बोस यांचा जन्म.
[१९२०]=> संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.
[१९२०]=> संतसाहित्याचे अभ्यासक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म.
[१९२२]=> मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.
[१९२२]=> शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बायर फिद्रिक यांचे निधन.
[१९२४]=> रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
[१९३४]=> हिंदी चित्रपट निर्माते आणि दिगदर्शक विजय आनंद यांचा जन्म.
[१९४७]=> भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
[१९६३]=> डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
[१९६७]=> क्रांतिकारक, दिद्वान, कृषितज्ज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉ. पांडुरंग
सदाशिव खानखोजे यांचे निधन.
[१९७१]=> सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
[१९७२]=> राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन.
[१९७३]=> अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचे निधन.
[१९७५]=> केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचे निधन.
[१९७८]=> इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचे निधन.
[१९९९]=> ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्याच्या दोन मुलांची ओदिशाच्या केओंझोर जिल्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
[१९९९]=> ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार
जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
[२००१]=> आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
[२०१५]=> बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.
हे पण पहा :- मराठी साहित्य अकादमी पुरस्कार
तुम्हाला २२ जानेवारी दिनविशेष | 22 January Dinvishesh | 22 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box