२३ फेब्रुवारी दिनविशेष | 23 February Dinvishesh | 23 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 22, 2024

२३ फेब्रुवारी दिनविशेष | 23 February Dinvishesh | 23 February day special in Marathi

२३ फेब्रुवारी दिनविशेष

23 February Dinvishesh

23 February day special in Marathi

२३ फेब्रुवारी दिनविशेष | 23 February Dinvishesh | 23 February day special in Marathi

            २३ फेब्रुवारी दिनविशेष ( 23 February Dinvishesh | 23 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २३ फेब्रुवारी दिनविशेष ( 23 February Dinvishesh | 23 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२३ फेब्रुवारी दिनविशेष

23 February Dinvishesh

23 February day special in Marathi


@ संत गाडगे महाराज यांची जयंती [ Sant Gadge Maharaj's birth anniversary ]

[१४५५]=> पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले.

[१६३३]=> विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचा जन्म.

[१७३९]=> चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.

[१७७७]=> जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचे निधन.

[१७९२]=> ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचे निधन.

[१८५०]=> रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिस चे निर्माते सीझर रिट्झ यांचा जन्म.

[१८७६]=> देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म.

[१९०४]=> होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक महेन्द्र लाल सरकार यांचे निधन.

[१९१३]=> जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचा जन्म.

[१९४१]=> डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.

[१९४४]=> अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचे निधन.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.


[१९४५]=> दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई – अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.

[१९४७]=> आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना.

[१९५२]=> संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.

[१९५७]=> तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचा जन्म.

[१९६५]=> झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हेलेना सुकोव्हा यांचा जन्म.

[१९६५]=> मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर अशोक कामटे यांचा जन्म.

[१९६६]=> सीरियात लष्करी उठाव झाला.

[१९६९]=> चित्रपट अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचे निधन.

[१९९६]=> कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.

[१९९७]=> रशियाच्या मीर या अंतराळस्थानकामधे आग लागली.

[१९९८]=> क्रिकेटपटू रमण लांबा यांचे निधन.

[२०००]=> वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे यांचे निधन.

[२०००]=> संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

[२००४]=> केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचे निधन.

[२००४]=> हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विजय आनंद यांचे निधन.

[२०११]=> सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन.


हे पण पहा :- हिंदी बोधकथा

            तुम्हाला २३ फेब्रुवारी दिनविशेष | 23 February Dinvishesh | 23 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad