२३ जानेवारी दिनविशेष | 23 January Dinvishesh | 23 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 22, 2024

२३ जानेवारी दिनविशेष | 23 January Dinvishesh | 23 January day special in Marathi

२३ जानेवारी दिनविशेष

23 January Dinvishesh

23 January day special in Marathi

२३ जानेवारी दिनविशेष | 23 January Dinvishesh | 23 January day special in Marathi

            २३ जानेवारी दिनविशेष ( 23 January Dinvishesh | 23 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २३ जानेवारी दिनविशेष ( 23 January Dinvishesh | 23 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२३ जानेवारी दिनविशेष

23 January Dinvishesh

23 January day special in Marathi


@ नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. [ Birth Anniversary of Netaji Subhash Chandra Bose. ]

[१५६५]=> विजयनगर साम्राज्याची अखेर.

[१६६४]=> शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन.

[१७०८]=> छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.

[१८१४]=> भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म.

[१८४९]=> डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर बनल्या.

[१८९७]=> नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म.

[१८९८]=> गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचा जन्म.

[१९१५]=> उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचा जन्म.

[१९१९]=> नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन.

[१९२०]=> व्यासंगी लेखक श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्म.

[१९२६]=> हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म.



[१९३१]=> द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना अॅना पाव्हलोव्हा यांचे निधन.

[१९३२]=> प्रभात च्या अयोध्येचा राजा ची हिन्दी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली.

[१९३४]=> ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म.

[१९४३]=> दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने लिबीयाची राजधानी त्रिपोली शहर जिंकले.

[१९४७]=> इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष मेगावती सुकार्नोपुत्री यांचा जन्म.

[१९५९]=> शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित विठ्ठल नारायण चंदावरकर यांचे निधन.

[१९६८]=> शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.

[१९७३]=> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे 
जाहीर केले.

[१९८९]=> स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचे निधन.

[१९९२]=> भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर यांचे 
निधन.

[१९९७]=> मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.

[२००२]=> वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण.

[२०१०]=> शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचे निधन.

हे पण पहा :- १६ महाजन पदे

            तुम्हाला २३ जानेवारी दिनविशेष | 23 January Dinvishesh | 23 January day special in Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad