२६ जानेवारी दिनविशेष | 26 January Dinvishesh | 26 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 25, 2024

२६ जानेवारी दिनविशेष | 26 January Dinvishesh | 26 January day special in Marathi

२६ जानेवारी दिनविशेष

26 January Dinvishesh

26 January day special in Marathi

२६ जानेवारी दिनविशेष | 26 January Dinvishesh | 26 January day special in Marathi

            २६ जानेवारी दिनविशेष ( 26 January Dinvishesh | 26 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २६ जानेवारी दिनविशेष ( 26 January Dinvishesh | 26 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२६ जानेवारी दिनविशेष

26 January Dinvishesh

26 January day special in Marathi


@ भारताचा प्रजासत्ताक दिन [ Republic Day of India ]

[१५६५]=> विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.

[१६६२]=> लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया.

[१७३०]=> कवी श्रीधर यांनी समाधि घेतली.

[१८२३]=> देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचे निधन.

[१८३७]=> मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.

[१८७६]=> मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.

[१८९१]=> बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्हे यांचा जन्म.

[१९२१]=> सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचा जन्म.

[१९२४]=> रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.

[१९२५]=> अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर पॉल न्यूमन यांचा जन्म.

[१९३३]=> भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली.

[१९४२]=> दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.

[१९४९]=> भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.


[१९५०]=> एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[१९५०]=> भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.

[१९५४]=> देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचे निधन.

[१९५७]=> क्रिकेटपटू शिवलाल यादव यांचा जन्म.

[१९६५]=> भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.

[१९६८]=> लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन.

[१९७८]=> महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.

[१९९८]=> कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.

[२००१]=> गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.

[२०१५]=> व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचे निधन.




            तुम्हाला २६ जानेवारी दिनविशेष | 26 January Dinvishesh | 26 January day special in Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad