२८ फेब्रुवारी दिनविशेष | 28 February Dinvishesh | 28 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 27, 2024

२८ फेब्रुवारी दिनविशेष | 28 February Dinvishesh | 28 February day special in Marathi

२८ फेब्रुवारी दिनविशेष

28 February Dinvishesh

28 February day special in Marathi

२८ फेब्रुवारी दिनविशेष | 28 February Dinvishesh | 28 February day special in Marathi

            २८ फेब्रुवारी दिनविशेष ( 28 February Dinvishesh | 28 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २८ फेब्रुवारी दिनविशेष ( 28 February Dinvishesh | 28 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२८ फेब्रुवारी दिनविशेष

28 February Dinvishesh

28 February day special in Marathi


@ राष्ट्रीय विज्ञान दिन [ National Science Day ]

[१८४९]=> अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.

[१८७३]=> सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचा जन्म.

[१८९७]=> मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म.

[१९०१]=> रसायनशास्त्रज्ञ लिनस कार्ल पॉलिंग यांचा जन्म.

[१९२२]=> इजिप्तला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१९२६]=> स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन.

[१९२७]=> भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा जन्म.

[१९२८]=> डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधाला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.


[१९२९]=> भारतीय-अमेरिकन संशोधन रंगास्वामी श्रीनिवासन यांचा जन्म.

[१९३५]=> वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.

[१९३६]=> पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचे निधन.

[१९४०]=> बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.

[१९४२]=> द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक ब्रायन जोन्स यांचा जन्म.

[१९४४]=> संगीतकार व गीतकार रविन्द्र जैन यांचा जन्म.

[१९४८]=> ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांचा जन्म.

[१९५१]=> भारतीय क्रिकेटपटू करसन घावरी यांचा जन्म.

[१९६३]=> भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांचे निधन.

[१९६६]=> आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचे निधन.

[१९६७]=> टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लूस यांचे निधन.

[१९८६]=> स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या.

[१९९५]=> कथा, संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचे निधन.

[१९९८]=> अभिनेता राजा गोसावी यांचे निधन.

[१९९९]=> औध संस्थानचे राजे भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांचे निधन.



            तुम्हाला २८ फेब्रुवारी दिनविशेष | 28 February Dinvishesh | 28 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad