२८ जानेवारी दिनविशेष
28 January Dinvishesh
28 January day special in Marathi
२८ जानेवारी दिनविशेष ( 28 January Dinvishesh | 28 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २८ जानेवारी दिनविशेष ( 28 January Dinvishesh | 28 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२८ जानेवारी दिनविशेष
28 January Dinvishesh
28 January day special in Marathi
@ लाला लजपत राय यांची जयंती [ Birth anniversary of Lala Lajpat Rai ]
[१४५७]=> इंग्लंडचा राजा हेन्री (सातवा) यांचा जन्म.
[१५४७]=> इंग्लंडचा राजा हेन्री (आठवा) यांचे निधन.
[१६१६]=> संत दासोपंत समाधिस्थ झाले.
[१६६४]=> मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध.
[१८५१]=> बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले.
[१८६५]=> स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी तथा लाला लजपतराय यांचा जन्म.
[१८९९]=> स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्म.
[१९२५]=> शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म.
[१९३०]=> मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. जसराज यांचा जन्म.
[१९३७]=> चित्रपट व भावगीत गायिका सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर यांचा जन्म.
[१९४२]=> दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.
[१९५५]=> फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांचा जन्म.
[१९६१]=> एच. एम. टी. वॉच फॅक्टरी हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू
झाला.
[१९७७]=> मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
[१९८४]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचे निधन.
[१९८६]=> चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.
[१९९६]=> अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचे निधन.
[१९९७]=> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे यांचे निधन.
[२००७]=> संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचे निधन.
[२०१०]=> १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.
हे पण पहा :- भारतातील शासक व त्यांचा शासन काळ
तुम्हाला २८ जानेवारी दिनविशेष | 28 January Dinvishesh | 28 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box