२९ जानेवारी दिनविशेष
29 January Dinvishesh
29 January day special in Marathi
२९ जानेवारी दिनविशेष ( 29 January Dinvishesh | 29 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २९ जानेवारी दिनविशेष ( 29 January Dinvishesh | 29 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२९ जानेवारी दिनविशेष
29 January Dinvishesh
29 January day special in Marathi
@ भारतीय वृत्तपत्र दिन [ Indian Newspaper Day ]
[१२७४]=> संत निवृत्तीनाथ यांचा जन्म.
[१५९७]=> मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचे निधन.
[१७३७]=> अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचा जन्म.
[१७८०]=> जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.
[१८२०]=> इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचे निधन.
[१८४३]=> अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांचा जन्म.
[१८५३]=> ओडिया साहित्यिक मधुसूदन राव यांचा जन्म.
[१८६०]=> रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचा जन्म.
[१८६१]=> कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.
[१८६६]=> साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचा जन्म.
[१८८६]=> कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.
[१९२२]=> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचा जन्म.
[१९२६]=> भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचा जन्म.
[१९३४]=> नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचे निधन.
[१९५१]=> वेस्ट इंडिजचे जलदगती गोलंदाज अँडी रॉबर्टस यांचा जन्म.
[१९६३]=> अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे निधन.
[१९६३]=> लेखक व संपादक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन.
[१९७०]=> ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड यांचा जन्म.
[१९७५]=> इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.
[१९८९]=> हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
[१९९३]=> गणितज्ञ रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.
[१९९५]=> रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक रुपेश कुमार यांचे निधन.
[२०००]=> बासरीवादक देवेन्द्र मुर्डेश्वर यांचे निधन.
[२०००]=> शिवसेना नेते पांडुरंग सावळाराम तथा काका वडके यांचे निधन.
[२००१]=> महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राम मेघे यांचे निधन.
हे पण पहा :- महोत्सव वर्ष
तुम्हाला २९ जानेवारी दिनविशेष | 29 January Dinvishesh | 29 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box