५ फेब्रुवारी दिनविशेष
5 February Dinvishesh
5 February day special in Marathi
५ फेब्रुवारी दिनविशेष ( 5 February Dinvishesh | 5 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ५ फेब्रुवारी दिनविशेष ( 5 February Dinvishesh | 5 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
५ फेब्रुवारी दिनविशेष
5 February Dinvishesh
5 February day special in Marathi
[१२९४]=> अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.
[१७६६]=> माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट.
[१७८८]=> युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांचा जन्म.
[१८४०]=> डनलप रबर चे सहसंस्थापक जॉन बॉईड डनलप यांचा जन्म.
[१९०५]=> स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचा जन्म.
[१९१४]=> प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म.
[१९१९]=> चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.
[१९२०]=> आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली.
[१९२२]=> रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
[१९२७]=> हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचे निधन.
[१९३३]=> लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांचा जन्म.
[१९३६]=> कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म.
[१९४५]=> दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.
[१९४८]=> गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.
[१९५२]=> स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
[१९५८]=> ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
[१९६२]=> फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
[१९७६]=> अभिनेता अभिषेक बच्चन यांचा जन्म.
[२०००]=> गायिका कालिंदी केसकर यांचे निधन.
[२००३:]=> ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या हरिजन या मराठी अंकाचे संपादक गणेश गद्रे यांचे निधन.
[२००३]=> भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
[२००४]=> पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
[२००८]=> योग गुरू महर्षी महेश योगी यांचे निधन.
[२०१०]=> चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचे निधन.
हे पण पहा :- वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
तुम्हाला ५ फेब्रुवारी दिनविशेष | 5 February Dinvishesh | 5 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box