६ जानेवारी दिनविशेष | 6 January Dinvishesh | 6 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 5, 2024

६ जानेवारी दिनविशेष | 6 January Dinvishesh | 6 January day special in Marathi

६ जानेवारी दिनविशेष

6 January Dinvishesh

6 January day special in Marathi

६ जानेवारी दिनविशेष | 6 January Dinvishesh | 6 January day special in Marathi

             जानेवारी दिनविशेष ( 6 January Dinvishesh | 6 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ६ जानेवारी दिनविशेष ( 6 January Dinvishesh | 6 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

६ जानेवारी दिनविशेष

6 January Dinvishesh

6 January day special in Marathi


@ राष्ट्रीय पत्रकार दिन [ National Journalists Day ]

@ युद्ध अनाथांचा जागतिक दिवस [ World War Orphans Day ]

[१४१२]=> फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या संत जोन ऑफ आर्क यांचा जन्म.

[१६६५]=> शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.

[१६७३]=> कोंडाजी फर्जद यांनी फक्त ६० मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे १३ वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.

[१७४५]=> बलूनच्यासहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणाऱ्या जाक्कास एलियन माँटगोल्फिएर यांचा जन्म.

[१७९६]=> महादजी शिंदे यांचे सेनापती जिवबा दादा बक्षी यांचे निधन.

[१८१२]=> मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म.

[१८२२]=> उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या हेन्रीचा श्लीमन यांचा जन्म.

[१८३२]=> पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले.

[१८३८]=> सॅम्युअल मॉर्स यांनी तारयंत्राचा शोध लावला.

[१८४७]=> दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचे निधन.


[१८५२]=> अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक लुई ब्रेल यांचे निधन.

[१८६८]=> आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचा जन्म.

[१८८३]=> लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार खलील जिब्रान यांचा जन्म.

[१८८४]=> जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचे निधन.

[१८८५]=> आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदू हरीश्चंद यांचे निधन.

[१९०७]=> मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.

[१९१२]=> न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७वे राज्य बनले.

[१९१८]=> जर्मन गणितज्ञ जी. कँटर यांचे निधन.

[१९१९]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांचे निधन.

[१९२४]=> राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता.

[१९२७]=> प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेश मंत्री यांचा जन्म.

[१९२८]=> नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म.

[१९२९]=> गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.

[१९३१]=> पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट)अध्यक्ष डॉ. आर. डी. देशपांडे यांचा जन्म.

[१९४४]=> दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.

[१९५५]=> विनोदी अभिनेते व पटकथालेखक रोवान अॅटकिन्सन यांचा जन्म.

[१९५९]=> भारतीय क्रिकेटपटू कपिलदेव निखंज यांचा जन्म.

[१९६६]=> सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा जन्म.

[१९७१]=> जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचे निधन.

[१९८१]=> स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचे निधन.

[१९८४]=> महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचे निधन.

[२०१०]=> लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचे निधन.



            तुम्हाला ६ जानेवारी दिनविशेष | 6 January Dinvishesh | 6 January day special in Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad