७ फेब्रुवारी दिनविशेष | 7 February Dinvishesh | 7 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 6, 2024

७ फेब्रुवारी दिनविशेष | 7 February Dinvishesh | 7 February day special in Marathi

७ फेब्रुवारी दिनविशेष

7 February Dinvishesh

7 February day special in Marathi

७ फेब्रुवारी दिनविशेष | 7 February Dinvishesh | 7 February day special in Marathi

            ७ फेब्रुवारी दिनविशेष ( 7 February Dinvishesh | 7 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ७ फेब्रुवारी दिनविशेष ( 7 February Dinvishesh | 7 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

७ फेब्रुवारी दिनविशेष

7 February Dinvishesh

7 February day special in Marathi


[१३३३]=> निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.

[१६९३]=> रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.

[१८०४]=> डिरे अँड कंपनीचे संस्थापक जॉन डिरे यांचा जन्म.

[१८१२]=> इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म.

[१८५६]=> ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.

[१८७३]=> आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचा जन्म.

[१९०६]=> रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म.

[१९१५]=> गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.

[१९२०]=> बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.


[१९३४]=> चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म.

[१९३८]=> अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन.

[१९३८]=> कम्युनिस्ट नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.

[१९४८]=> कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

[१९६५]=> मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.

[१९७१]=> स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

[१९७४]=> ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.

[१९७७]=> सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.

[१९९९]=> जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन.

[१९९९]=> युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.

[२००३]=> क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.


            तुम्हाला ७ फेब्रुवारी दिनविशेष | 7 February Dinvishesh | 7 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad