८ फेब्रुवारी दिनविशेष
8 February Dinvishesh
8 February day special in Marathi
८ फेब्रुवारी दिनविशेष ( 8 February Dinvishesh | 8 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ८ फेब्रुवारी दिनविशेष ( 8 February Dinvishesh | 8 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
८ फेब्रुवारी दिनविशेष
8 February Dinvishesh
8 February day special in Marathi
[१६७७]=> फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचा जन्म.
[१७००]=> डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचा जन्म.
[१७१४]=> छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.
[१७२५]=> रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचे निधन.
[१८२८]=> फ्रेन्च लेखक ज्यूल्स वर्न यांचा जन्म.
[१८३४]=> रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंदेलिएव्ह यांचा जन्म.
[१८४४]=> भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म.
[१८४९]=> रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
[१८९७]=> भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म.
[१८९९]=> रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
[१९०९]=> तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म.
[१९२५]=> शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म.
[१९२७]=> ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन.
[१९३१]=> महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.
[१९३६]=> १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.
[१९४१]=> गझलगायक जगजीतसिंग यांचा जन्म.
[१९४२]=> दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
[१९६०]=> पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.
[१९६३]=> भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.
[१९६३]=> भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.
[१९७१]=> NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
[१९७१]=> मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचे निधन.
[१९७५]=> नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिनसन यांचे निधन.
[१९९४]=> कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन.
[१९९४]=> ख्यातनाम चित्रकार गोपाळराव देऊसकर यांचे निधन.
[१९९४]=> भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
[१९९५]=> भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल भास्करराव सोमण यांचे निधन.
[१९९९]=> आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन.
[२०००]=> छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
[२०१५]=> नीती आयोगाची पहिली बैठक
हे पण पहा :- विसर्ग संधी
तुम्हाला ८ फेब्रुवारी दिनविशेष | 8 February Dinvishesh | 8 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box