राष्ट्रीय युवा दिन भाषण
National Youth Day speech in Marathi
Swami Vivekanand Jayanti
राष्ट्रीय युवा दिन भाषण ( National Youth Day speech in Marathi | Swami Vivekanand Jayanti | Rashtriy Yuva Din ) याविषयी माहिती आज आपण येथे पाहणार आहोत.
राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day):-
राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) भारतात दरवर्षी १२ जानेवारी या दिवशी म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ पासून अंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात यावा अशी घोषणा केली. तेव्हा पासून भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजेच १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) म्हणून घोषित केला. त्यांच्या मते तरुणांनी स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार व त्यांचे कार्य आत्मसात करावेत ते अविस्मरणीय व प्रेरणादायी आहेत त्यामुळे युवावर्ग नक्कीच युवा वर्ग प्रेरित होतील व देशात शांतात, सुव्यवस्था व विकासात आपले योगदान देतील.
स्वामी विवेकानंद यांचे बालपण :-
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी बंगालमधील कलकत्ता ( सिम्लापल्ली ) मध्ये झाला होता. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त होते. वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते व ते कोलकत्ता उच्च न्यायालयात प्रसिद्द वकील होते. विवेकानंद यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. विवेकानादांचे आई व वडील दोघेपण धार्मिक व पुरोगामी विचार सर्नीचे होते. स्वामी विवेकानंद यांचे आजोबा पर्शियन आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते. त्यांच्या घरात धार्मिक, आध्यात्मिक व सुरक्षित वातावरण असल्याने त्याच्यावर चांगला प्रभाव पडला. ते एक प्रसिद्ध व प्रभावशाली आध्यात्मिक गुरु बनले त्यांनी त्यांच्या २५ व्या वर्षी संसारिक मोहाचा त्याग करून सन्यास घेतला.
हे पण पहा :- मराठी भाषा गौरव दिन
स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण :-
स्वामी विवेकानंद यांना शिक्षणाची फार आवड होती त्यांमुळे त्यांनी घरीच शिक्षणाची सुरवात केली नंतर त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये ( Metropolitan Institution ) १८७१ साली प्रवेश घेतला. तसेच ते १८७९ साली प्रेसिडेन्सी कॉलेजची (Presidency College) प्रवेश परीक्षा देखील उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी जनरल असेम्ब्ली इन्स्टिट्यूशनमध्ये (General Assembly Institution) प्रवेश घेऊन त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर त्यांनी १८८१ साली ते फाइन आर्टची (Fine art) व १८८४ मध्ये बी.ए.ची (B.A.) परीक्षा देखील उत्तीर्ण झाले.
स्वामी विवेकानंद यांना जीवनाला कलाटणी देणारे क्षण :-
स्वामी विवेकानंद यांचा १८८१ मध्ये रामकृष्ण परमहंस यांच्याशी परिचय झाला. तेव्हापासून त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून आले खर्या अर्थाने तेव्हापासूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. रामकृष्ण परमहंस यांचा योगसाधनेवर फार विश्वास होता त्यांच्या मते योगसाधनेच्या मार्गाने मोक्षप्राप्ती होते. त्यांच्या याच विचारांचा स्वामी विवेकानंद यांच्यावर देखील मोठा प्रभाव पडला म्हणून त्यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरु मानले. त्याकाळी बंगालमधील ब्राह्मो समाजाच्या प्रभावा होता ते मूर्तिपूजा व बहुदेवतावाद यांच्या विरोधी होते. परंतु त्यांना रामकृष्ण परमहंस यांचा सहवास लाभला व त्यांच्या विचारांत बदल घडून ते सनातन हिंदू धर्म व तत्त्वज्ञान यांचे समर्थक बनले. स्वामी विवेकानंद यांनी सहा वर्षे एकांतात योगसाधना केली व नंतर त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर भ्रमंती केली.
शिकागो परिषद :-
अमेरिकेतील शिकागो या शहरात ११ सप्टेंबर १८९३ मध्ये आर्ट इंस्टीट्यूट ऑफ शिकागो येथे जागतिक सर्व धर्मीय परिषद भरली होती. या परिषदेला उपस्थित राहून त्यांनी हिंदू धर्माची बाजू अतिशय प्रभावीपणे व स्पष्टपणे मांडली. त्यात त्यांनी हिंदू धर्माची श्रेष्ठता व उदात्तता त्यांनी सर्वांना पटवून दिली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरवातच 'प्रिय बंधु आणि भगिनींनो' अशी करून तेथील उपस्थित सर्व श्रोत्यांची त्यांनी मने जिंकली. व तेथे दोन मिनटापर्यत तेथे टाळ्या वाजतच राहिल्या. भारताच्या इतिहासातील ही एक अभिमानाची आणि सन्मानाची घटना म्हणून ओळखली जाते. परिषदेत सर्वांनी आपली ग्रंथ ठेवली होती तेव्हा प्रत्येक व्यक्ती आपला ग्रंथ वरती ठेवण्याचा प्रयत्न करत होता अशाने आपला गीता हा ग्रंथ सर्वात खाली ठेवला गेला तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात सागितले की आमचा गीता हा ग्रंथ सर्व ग्रंथांचा पाया आहे म्हणून तो सर्वात खाली ठेवण्यात आला आहे.
हे पण पहा :- राष्ट्रीय विज्ञान दिन
स्वामी विवेकानंदांचे कार्य :-
स्वामी विवेकानंद यांच्याकडे असलेल्या ज्ञान व प्रभावी व्यक्तिमत्वामुळे तेथील लोकांचे ते आवडते बनले कारण त्यांनी अमेरिकेत हिंदू धर्माचा महान संदेश पसरवला. हे कार्य करत असताना त्यांनी दोन वर्षे तेथे वास्तव्य केले. त्यानंतर स्वामीजींनी इंग्लंडला जाऊन आपल्या व्यक्तिमत्त्व व विचार यांनी लोकांना प्रभावित केले. इंग्लंडमध्ये त्यांना अनेक अनुयायी मिळाले. इंग्लंडमधील कु. मार्गारिट नोबेल या त्यांच्या शिष्या बनल्या. पुढे त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार करून त्या भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्ध झाल्या.
रामकृष्ण मिशन ची स्थापना
स्वामी विवेकानंद यांनी १ मे १८९७ मध्ये कोलकत्ता येथे रामकृष्ण मिशन ची स्थापना केली व १८९८ मध्ये बेलूर येथे गंगा नदीच्या काठावर रामकृष्ण मठाची स्थापना करण्यात आली. बेलूर मठात एकदा प्राइवेट गार्डन हाउस असल्याचे सांगून कर वाढवला. मात्र, नंतर ब्रिटीश दंडाधिकार्यांनी तपास केल्यानंतर हा कर हटवण्यात आला. स्वामी विवेकानंद हे चहाप्रेमी होते. पण त्यावेळी काही लोक चहाच्या विरोधात होते. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या मठात चहा आणला. स्वामी विवेकानंद यांच्या मते जगातीमध्ये असणारे सर्वच धर्म हे सत्य आहेत व त्या सर्व धर्मांचे एकच ध्येय फक्त तिथपर्यंत जाण्याचे मार्ग मात्र वेगवेगळे आहे. मूर्तीची पूजा करणे आत्मसाक्षात्कार घडवून आणण्यास मदत करते. अशा प्रकारची रामकृष्ण मिशनची शिकवण होती. त्यांनी जगात ठिकठिकाणी रामकृष्ण मिशनच्या शाखा स्थापन करून ठिकठिकाणी त्यांचे कार्य चालू ठेवले.
सनातन हिंदू धर्माच्या आधारे व्यापक विश्वधर्माचा संदेश जगाला देणे, हिंदू धर्माच्या खऱ्या तत्त्वज्ञानाची त्यांना ओळख करून देणे, हिंदू धर्मातील अद्वैत तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व लोकांना पटवून देणे, इत्यादी कामे रामकृष्ण मिशनने केली. त्यांनी धार्मिक सुधारणेबरोबर सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर ठिकठिकाणी अनाथाश्रम, रुग्णालये, वसतिगृहे स्थापन केले. नैसर्गिक आपत्तींच्या काळात संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यातही रामकृष्ण मिशनने पुढाकार घेतला. स्वामी विवेकानंद एक युग पुरुष होते त्यांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून लोकांमध्ये राष्ट्रभक्ती व स्वदेशाभिमान यांची जाणीव करून दिली व त्यांना कार्यप्रवण बनविण्याचे कार्यही केले.
स्वामी विवेकानंदांचे निधन :-
स्वामी विवेकानंद १९०० मध्ये युरोपातून भारतात आले व ते बेलूर येथे त्यांच्या मठावर गेले कारण त्यांना आपल्या अनुयायांसोबत वेळ घालवायचा होता. हा प्रवास त्यांच्या जीवनातील शेवटचा प्रवास होता. अशा या युग पुरुषाने ४ जुलै, १९०२ रोजी जगाचा निरोप घेतला.
हे पण पहा :- प्रजासत्ताक दिन
तुम्हाला राष्ट्रीय युवा दिन भाषण ( National Youth Day speech in Marathi | Swami Vivekanand Jayanti | Rashtriy Yuva Din ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box