राजमाता जिजाऊ भाषण
राजमाता जिजाबाई भोसले माहिती
Rajmata Jijau Speech in Marathi
Rajmata Jijabai Bhosale Information
स्वराज्याचा जिने घडविला विधाता,धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता ॥
सर्व प्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन, सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पूज्य गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या ताई दादांनो. आज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत. त्यानिमित्त तुम्हाला मी जे दोन शब्द सांगतो ते तुम्ही शांततेने ऐकावे. ही नम्र विनंती.
स्वराज्य जननी, राजमाता, मासाहेब, वीरमाता, मातोश्री अशा अनेक उपमा ज्यांना दिल्या जातात अशा त्या जिजाबाई शहाजीराजे भोसले. म्ह्जेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई. परंतु तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की त्यांना इतक्या उपमा का दिल्या जातात. वीरमाता जिजाऊ यांचे कार्यच इतक महान आहे की त्यांना या उपमा देखील कमी पडतील.
हे पण पहा :- सावित्रीबाई फुले
राजमाता जिजाबाई यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील देऊळगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. तसेच सिंदखेडराजा येथील मातब्बर सरदार होते. जिजाबाईना लहानपणापासुनच विविध विद्याबरोबर राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू मिळाले होते. त्यांच्या लहान वयातच त्यांचा विवाह डिसेंबर १६०५ मध्ये वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले यांचे चिरंजीव शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाबाई यांच्या पोटी तेजस्वी, पराक्रमी अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजामाता आणि शहाजीराजे यांना दोन मुले होती. थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजांसोबत असायचा तर धाकटा मुलगा शिवाजी हा लहानपणापासून जिजामातांसोबत असायचा. त्यांनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण व महाभारतातील राम, कृष्ण, अर्जुन, भीम या वीरांच्या गोष्टी सांगून संस्कार केले. नेहमी सत्याचा विजय होतो तसेच अन्याय करणे व अन्यास सहन करणे दोन्हीही कसे चुकीचे आहे हे पटवून देत. शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी शिवरायांवर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्यस्वप्न इत्यादींचे संस्कार केले.
हे पण पहा :- महात्मा गांधी भाषण
शिवाजी महाराज चौदा वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय वाईट होती. या जुलमी सत्तांच्या कचाट्यातून रयतेला अतोनात त्रास सहन करावे लागत होते. त्यांना या त्रासातून वाचवायला हवं असं जिजामातांना नेहमी वाटे. त्या कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. त्यांनी स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्याच्या कार्यात शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या. जीव धोक्यात घालावा लागला. परंतु त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेऊन स्वराज्यासाठी शिवरायांना धोका पत्कारण्यापासून रोखले नाही. त्यांच्या त्यागाच्या जीवावरच हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही कारण १७ जून १६७४ रोजी किल्ले राजगडजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले.
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षातसाकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान,चातुर्यर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशासत्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता जिजाऊयांना मानाचा मुजरा ।।
या लेखातून तुम्हाला राजमाता जिजाऊ जयंती | राजमाता जिजाऊ पुण्यतिथी | राजमाता जिजाऊ भाषण ( Rajmata Jijau Speech) | राजमाता जिजाबाई भोसले माहिती ( Rajmata Jijabai Bhosale Information ) ही माहिती मिळाली असेल.
हे पण पहा :- राष्ट्रीय युवा दिन भाषण
या लेखातून तुम्हाला राजमाता जिजाऊ जयंती | राजमाता जिजाऊ पुण्यतिथी | राजमाता जिजाऊ भाषण ( Rajmata Jijau Speech) | राजमाता जिजाबाई भोसले माहिती ( Rajmata Jijabai Bhosale Information ) ही माहिती मिळाली असेल.
हे पण पहा :- राष्ट्रीय युवा दिन भाषण
तुम्हाला राजमाता जिजाऊ भाषण व माहिती | Rajmata Jijau Speech in Marathi | Rajmata Jijabai Bhosale Information ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.
तुम्हाला राजमाता जिजाऊ भाषण व माहिती | Rajmata Jijau Speech in Marathi | Rajmata Jijabai Bhosale Information ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box