सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
Savitribai Phule Scholarship Scheme
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ( Savitribai Phule Scholarship Scheme ) :-
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे स्वरूप, नियम, अटी व पात्रता याविषयी आपल्याला माहिती येथे उपलब्ध करून देण्याचा छोटासा प्रयत्न.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे स्वरूप :-
मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कधी करण्याच्या हेतूने इ.५ वी ते इ.७ वीतील मुलींसाठी १९९५-९६ पासून शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर इ.८ वी ते इ. १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ सालापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत इ.८ वी ते इ. १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने रुपये १०० /- प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते. या शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील दलित विद्यार्थीनीला दरमहा रु.१०० /- मिळणार आहेत. ज्या घरात मुलगी म्हणजे ओझे समजले जाते अशा घरात तिला आता न्याय मिळू शकेल. मुलींचे सक्षमीकरण कारणे हा या योजनेमागचा हेतू आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी अटी :-
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित, विनानुदानित, माध्यमिक शाळेतील इ.८ वी ते इ.१० वी च्या मुलींसाठी असून ती गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहील. यासाठी मागासवर्गीय मुलींना उत्पन्नाची अट राहणार नाही. परंतु शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. उपस्थितीनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी मुलींना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे स्वरुप :-
इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणार्याफ अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इ. ८ वी ते १० वी मध्ये शिकणार्या अनुसूचित जातीच्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने अनुक्रमे सन १९९६ व २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
इयत्ता शिष्यवृत्ती दर कालावधी ५ वी ते ७ वी दरमहा रु. ६०/- प्रमाणे रु. ६००/- १० महिने ८ वी ते १० वी दरमहा रु. १००/- प्रमाणे रु. १०००/- १० महिने
इयत्ता | शिष्यवृत्ती दर | कालावधी |
---|---|---|
५ वी ते ७ वी | दरमहा रु. ६०/- प्रमाणे रु. ६००/- | १० महिने |
८ वी ते १० वी | दरमहा रु. १००/- प्रमाणे रु. १०००/- | १० महिने |
नियम, अटी व पात्रता :-
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे नियम, अटी व पात्रता पुढील परमाने
➤ उत्पन्न व गुणाची अट नाही.
➤ संबंधित शाळेच्या मुख्याणद्यापकांनी विद्यार्थ्यांबचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्येक.
➤ ७५% उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावा.
➤ लाभधारक मुलगी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी.
➤ सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील खात्यामध्ये/ ऑनलाईन जमा करण्यात येते.
हे पण पहा :- विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम
तुम्हाला सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना | Savitribai Phule Scholarship Scheme ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box