श्रीरामाची आरती | Shri Ramachi Aarti - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, January 21, 2024

श्रीरामाची आरती | Shri Ramachi Aarti

श्रीरामाची आरती

Shri Ramachi Aarti

श्रीरामाची आरती | Shri Ramachi Aarti

श्रीरामाची आरती ( Shri Ramachi Aarti ) :- 

          आपण कोणतेही काम शुभ होण्यासाठी देवाची आराधना करतो व त्यातून आमचे चांगले व निर्विघन होवो अशी प्रार्थना करतो. त्यासाठी आपण आरती म्हणतो अशाच श्रीरामाची आरती ( Shri Ramachi Aarti ) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या आरती संग्रहात तुम्हाला पुढील आरती मिळतील.

श्रीरामाची आरती - १

( Shri Ramachi Aarti )

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।

स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली ।
देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरिली ।
शब्दरूप मारुतीने सच्छुद्धि आणिली ।
तव चरणांबुजी येऊन वार्ता श्रृत केली ।
जय देव जय देव निजबोधा रामा ।। १ ।।

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटोनी ।। २ ।।

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला ।
आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। ३ ।।

निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ४ ।।

अनाहतध्वनि गर्जती अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरीं होत आहे आनंद थोर ।। ५ ।।

सहजसिंहासनी राजा रघुवीर ।
सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ६ ।।


श्रीरामाची आरती - २

( Shri Ramachi Aarti )

जयदेव जयदेव आत्मया रामा ।
निगमागम शोधीता न कळे गुणसीमा॥ध्रु.॥

नाना देही देव एक विराजे।
नाना नाटकलीला सुंदर रूप साजे।
नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे।
अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे ॥१॥

बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा।
हरि-हर-ब्रह्मादिक देव सकळांचा।
युगानुयुगी आत्माराम आमुचा।
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ॥२॥
          तुम्हाला श्रीरामाची आरती | Shri Ramachi Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad