१७ फेब्रुवारी दिनविशेष
17 February Dinvishesh
17 February day special in Marathi
१७ फेब्रुवारी दिनविशेष ( 17 February Dinvishesh | 17 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १७ फेब्रुवारी दिनविशेष ( 17 February Dinvishesh | 17 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१७ फेब्रुवारी दिनविशेष
17 February Dinvishesh
17 February day special in Marathi
[१६००]=> सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्या जिओर्डानो ब्रुनो यांना बायबल विरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले.
[१८०१]=> अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह् ने जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.
[१८५४]=> जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचा जन्म.
[१८७४]=> अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचा जन्म.
[१८८१]=> क्रांतीवीर, समाजसेवक लहुजी राघोजी साळवे ऊर्फ लहुजी वस्ताद यांचे निधन.
[१८८३]=> राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन.
[१९२७]=> रणदुंदुभि नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
[१९३३]=> अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होती.
[१९६३]=> एनव्हीडिया चे सहसंस्थाक जेन-ह्सून हुआंग यांचा जन्म.
[१९६४]=> अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
[१९७८]=> कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन.
[१९८६]=> भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे निधन.
[१९८८]=> बिहारचे ११ वे मुख्यमंत्री कापुरी ठाकूर यांचे निधन.
[१९९६]=> महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्ह यांच्या कडून पराभूत.
[२००८]=> कोसोव्हो देशाने स्वातंत्र्य जाहीर केले.
हे पण पहा :- क्रांती दिन
तुम्हाला १७ फेब्रुवारी दिनविशेष | 17 February Dinvishesh | 17 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box