२६ फेब्रुवारी दिनविशेष | 26 February Dinvishesh | 26 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 25, 2024

२६ फेब्रुवारी दिनविशेष | 26 February Dinvishesh | 26 February day special in Marathi

२६ फेब्रुवारी दिनविशेष

26 February Dinvishesh

26 February day special in Marathi

२६ फेब्रुवारी दिनविशेष | 26 February Dinvishesh | 26 February day special in Marathi

            २६ फेब्रुवारी दिनविशेष ( 26 February Dinvishesh | 26 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २६ फेब्रुवारी दिनविशेष ( 26 February Dinvishesh | 26 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२६ फेब्रुवारी दिनविशेष

26 February Dinvishesh

26 February day special in Marathi

@ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी [ Death anniversary of freedom fighter Vinayak Damodar Savarkar ]

[१८०२]=> जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचा जन्म.

[१८२९]=> अमेरिकन लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉस यांचा जन्म.

[१८६६]=> अमेरिकन डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचा जन्म.

[१८७४]=> प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म.

[१८७७]=> कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचे निधन.

[१८८६]=> गुजराथी लेखक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचे निधन.

[१८८७]=> भारतीय डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा जन्म.

[१९०३]=> गटलिंग गन चे निर्माते रिचर्ड जॉर्डन गटलिंग यांचे निधन.

[१९०८]=> भारतीय लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म.

[१९०९]=> सिनेमाकलर या पहिल्या रंगीत चित्रपट प्रथम पॅलेस थिएटर, लंडन मध्ये प्रदर्शित झाला.

[१९२२]=> चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण यांचा जन्म.

[१९२८]=> बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.

[१९३७]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म.

[१९३७]=> मानववंशशास्त्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचे निधन.

[१९६६]=> स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन.

[१९७६]=> वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.


[१९८४]=> इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.

[१९९५]=> बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.

[१९९८]=> परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.

[१९९९]=> आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.

[१९९९]=> आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले.

[२०००]=> बेळगाव येथील उद्योगपती बा. म. तथा रावसाहेब गोगटे यांचे निधन.

[२००३]=> व्यंगचित्रकार राम वाईरकर यांचे निधन.

[२००४]=> केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन.

[२००५]=> अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉश चे निर्माते जेफ रस्किन यांचे निधन.

[२०१०]=> समाजसुधारक व संघप्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचे निधन.


            तुम्हाला २६ फेब्रुवारी दिनविशेष | 26 February Dinvishesh | 26 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad