२७ फेब्रुवारी दिनविशेष | 27 February Dinvishesh | 27 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 26, 2024

२७ फेब्रुवारी दिनविशेष | 27 February Dinvishesh | 27 February day special in Marathi

२७ फेब्रुवारी दिनविशेष

27 February Dinvishesh

27 February day special in Marathi

२७ फेब्रुवारी दिनविशेष | 27 February Dinvishesh | 27 February day special in Marathi

            २७ फेब्रुवारी दिनविशेष ( 27 February Dinvishesh | 27 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २७ फेब्रुवारी दिनविशेष ( 27 February Dinvishesh | 27 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२७ फेब्रुवारी दिनविशेष

27 February Dinvishesh

27 February day special in Marathi


@ मराठी राजभाषा दिन [ Marathi Official Language Day ]

@ विष्णू वामन शिरवाडकर उर्फ ​​कुसुमाग्रज यांची जयंती [ Birth anniversary of Vishnu Vaman Shirwadkar alias Kusumagraj ]

[१८०७]=> अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचा जन्म.

[१८४४]=> डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१८९२]=> फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर लुई वूत्तोन यांचे निधन.

[१८९४]=> जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म.

[१८९४]=> जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचे निधन.

[१८९९]=> इन्सुलिन चे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म.

[१९००]=> ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.

[१९१२]=> ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

[१९२६]=> मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्‍ना देवधर यांचा जन्म.


[१९३१]=> थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले.

[१९३२]=> ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचा जन्म.

[१९३६]=> नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचे निधन.

[१९५१]=> अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

[१९५६]=> भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर यांचे निधन.

[१९८६]=> भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग यांचा जन्म.

[१९८७]=> अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान यांचे निधन.

[१९८७]=> मराठी राजभाषा दिन

[१९९७]=> गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर यांचे निधन.

[१९९९]=> पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.

[२००१]=> जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

[२००२]=> मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

[२०१०]=> भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचे निधन.


हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २७ फेब्रुवारी दिनविशेष | 27 February Dinvishesh | 27 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad