International Womens Day Speech In Marathi | जागतिक महिला दिन भाषण | आंतरराष्ट्रीय महिला दिन भाषण - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 24, 2024

International Womens Day Speech In Marathi | जागतिक महिला दिन भाषण | आंतरराष्ट्रीय महिला दिन भाषण

जागतिक महिला दिन भाषण

Jagtik Mahila Din Bhashan Marathi

International Womens Day Speech In Marathi

जागतिक महिला दिन भाषण | Jagtik Mahila Din Bhashan Marathi | International Womens Day Speech In Marathi

            जागतिक महिला दिन भाषण  ( International Women's Day Speech ) हे आपण महिलांविषयी आदर व त्यांचे उपकार प्रकट करण्यासाठी करत आहोत. हा दिवस महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी केलेल्या संघर्षाची आठवण म्हणून ८ मार्च या दिवशी साजरा केला जातो. New York येथे २८ फेब्रुवारी १९०९ रोजी पहिला महिला दिन ( Women's Day ) साजरा करण्यात आला होता. परंतु १९१० वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन ( International Women's Day ) निश्चित करण्यात यावा अशी सूचना मांडण्यात आली होती. म्हणून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन ( International Women's Day ) म्हणून निश्चित करण्यात आला.


            विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण जगात कोठेही स्रियांना मतदानाचा हक्क दिला जात नव्हता. या हक्कासाठी स्रिया आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतच होत्या. अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात सन १८९० मध्ये `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु यातही वर्णभेद, स्थलांतरित, देशांतरित अशा मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन त्या करीत होत्या. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला.

हे पण पहा :- आंतरराष्ट्रीय कामगार दिन

            १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. या परिषदेत क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.


            अमेरिकन कामगार स्त्रियांनी केलेल्या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

हे पण पहा :- वाचनाचे फायदे

            भारतातमध्ये देखील मुंबई येथे ८ मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिवस साजरा करण्यात आला. पुण्यात ८ मार्च १९७१ ला एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. तसेच युनोने ८ मार्च १९७१ ला `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. तव्हापासून महिलांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येऊ लागल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी मिळाली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            सरकारी तसेच खाजगी कार्यालयातून आता ८ मार्च हा दिवस महिला दिन ( Women's Day ) म्हणून साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन ( International Women's Day ) सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. १९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक महिला दिन ( International Women's Day ) साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.


            अशाच काही महिला ज्यांनी भारतात सर्वप्रथम आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर आपले यश संपादन केले त्यांची नावे व त्यांनी संपादन केलेले यश याची माहिती बघूया.


भारतातील पहिल्या महिला


नावपद
इंदिरा गांधीपंतप्रधान
सी. बी. मुथम्माराजदूत
सरोजिनी नायडूराज्यपाल (उत्तरप्रदेश)
सुचेता कृपलानीमुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)
राजकुमारी अमृत कौरकेंद्रीय मंत्री
सुलोचना मोदीमहापौर
सावित्रीबाई फुलेशिक्षक - मुख्याध्यापिका
कार्नेलिया सोराबजीबॅरिस्टर
मदर टेरेसानोबेल पारितोषिक विजेती
अरूंधती रॉयबुकर पारितोषिक विजेती
भानू अथय्याऑस्कर पुरस्कार विजेती
रिटा फारियामिस वर्ल्ड
सुष्मिता सेनमिस युनिव्हर्स
कॅप्टन चंद्रापॅराशूटमधून उडी घेणारी
किरण बेदीपोलीस सेवा महिला अधिकारी
कल्पना चावलाअंतराळ प्रवास करणारी
इंदिरा चावडाभारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी
बच्चेंद्री पालएव्हरेस्ट सर करणारी (गिर्यारोहक)
मंजुळा पद्मनाभनव्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर
आरती साहाइंग्लिश खाडी पोहून जाणारी ( जलतरणपटू )
डॉ. अदिती पंतअंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी (शास्त्रज्ञ)
सुरेखा यादव-भोसलेआशियातील रेल्वे इंजिन ड्रायव्हर
देविकाराणी रौरिचदादासाहेब फाळके पुरस्कार विजेती
डॉ. इंदिराहिंदुजा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी डॉक्टर
संतोष यादवदोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी (गिर्यारोहक)
करनाम मल्लेश्वरीऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती ( मल्ल )
हंसाबेन मेहताउपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे)
उज्ज्वला पाटील-धरशिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी 
शीतल महाजनपॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी 
फातिमाबिबी मिरासाहेबसर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिश
संगीता गुजून सक्सेनायुद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी ( फ्लाईंग ऑफिसर )
कमला सोहोनीकेंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी ( शास्त्रज्ञ )
विजयालक्ष्मी पंडीतसंयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची आणि जगातील अध्यक्ष
डॉ. आनंदी गोपाळ जोशीविदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी ( डॉक्टर )



सर्व महिलांना
जागतिक महिला दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.....!

🌹🌹🌹

हे पण पहा :- मराठी बोधकथा

          तुम्हाला जागतिक महिला दिन  | आंतरराष्ट्रीय महिला दिन | Jagtik Mahila Din Bhashan Marathi | International Womens Day Speech In Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad