१० मार्च दिनविशेष | 10 March Dinvishesh | 10 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 9, 2024

१० मार्च दिनविशेष | 10 March Dinvishesh | 10 March day special in Marathi

१० मार्च दिनविशेष

10 March Dinvishesh

10 March day special in Marathi

१० मार्च दिनविशेष | 10 March Dinvishesh | 10 March day special in Marathi

            १० मार्च दिनविशेष ( 10 March Dinvishesh | 10 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १० मार्च दिनविशेष ( 10 March Dinvishesh | 10 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१० मार्च दिनविशेष

10 March Dinvishesh

10 March day special in Marathi


@ प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन. [Famous poet V.V Shirwadkar alias Kusumagraj passed away.]

[१६२८]=> इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी लादेन यांचा जन्म.

[१८६२]=> अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली.

[१८७२]=> इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे निधन.

[१८७३]=> अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.

[१८९७]=> पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन.

[१९१८]=> गायक आणि अभिनेता सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व यांचा जन्म.

[१९२२]=> प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली.

[१९२९]=> कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म.

[१९४०]=> रशियन कथा, कादंबरीकार आणि नाटककार बुल गाकॉव्ह मिखाईल यांचे निधन.

[१९४५]=> केंद्रीय रेल्वे मंत्री माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म.

[१९५२]=> केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.


[१९५७]=> अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक ओसामा बिन लादेन यांचा जन्म.

[१९५९]=> पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचे निधन.

[१९७१]=> कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन.

[१९७२]=> वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

[१९७४]=> ट्विटर चे सहसंस्थापक बिझ स्टोन यांचा जन्म.

[१९७७]=> युरेनस ग्रहाला शनी ग्रहासारखी कडी असल्याचा शोध लागला.

[१९८५]=> भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन अॅण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली.

[१९८५]=> भारतीय क्रिकेट संघाने रवि शास्त्री यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब मिळाला.

[१९८५]=> सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टंटिन चेरेनेन्को यांचे निधन.

[१९९८]=> भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली.

[१९९९]=> प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन.


            तुम्हाला १० मार्च दिनविशेष | 10 March Dinvishesh | 10 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad