१५ मार्च दिनविशेष | 15 March Dinvishesh | 15 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 14, 2024

१५ मार्च दिनविशेष | 15 March Dinvishesh | 15 March day special in Marathi

१५ मार्च दिनविशेष

15 March Dinvishesh

15 March day special in Marathi

१५ मार्च दिनविशेष | 15 March Dinvishesh | 15 March day special in Marathi

            १५ मार्च दिनविशेष ( 15 March Dinvishesh | 15 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १५ मार्च दिनविशेष ( 15 March Dinvishesh | 15 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१५ मार्च दिनविशेष

15 March Dinvishesh

15 March day special in Marathi

@ जागतिक ग्राहक दिन [ World Consumer Day]

[इ.पू ४४]=> रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांची हत्या केली.

[१४९३]=> भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.

[१५६४]=> मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.

[१६८०]=> शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.

[१७६७]=> अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म.

[१८२०]=> मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.

[१८२७]=> टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.

[१८३१]=> मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीला सुरु झाले.

[१८६०]=> प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा मुंबई येथे जन्म.

[१८६६]=> पेपर क्लिप चे शोधक जॉन वालेर यांचा जन्म.

[१८७७]=> इंग्लंड व ऑस्ट्रेलियात जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.

[१८९२]=> लिव्हरपूल एफ.सी. ची स्थापना झाली.

[१९०१]=> पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक विजयपाल लालाराम उर्फ गुरु हनुमान यांचा जन्म.


[१९०६]=> रोल्स रॉईस या अलिशान कार कंपनीची सुरवात झाली.

[१९१९]=> हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.

[१९३७]=> रंगभूमीवरील अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचे निधन.

[१९३९]=> दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.

[१९५०]=> नियोजन आयोगाची स्थापना

[१९५६]=> ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे माय फेअर लेडी चा पहिला प्रयोग झाला.

[१९६१]=> ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.

[१९८५]=> symbolics.com या इंटरनेट वरील पहिल्या डोमेन नावाची नोंद झाली.

[१९९०]=> सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.

[१९९२]=> हिंदी आणि उर्दू कवी डॉ. राही मासूम रझा यांचे निधन.

[२०००]=> विचारवंत आणि कलासमीक्षक लेडी राणी मुखर्जी यांचे निधन.

[२००१]=> भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी सामन्यात २८१ धावा काढल्या.

[२००२]=> इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामुभाई जव्हेरी यांचे निधन.

[२००३]=> मुंबईतील कायदेतज्ज्ञ रवींद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.

[२०११]=> सीरियन युद्ध सुरु झाले.

[२०१३:]=> डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक डॉ. काल्लाम अंजी रेड्डी यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय लेखक नारायण देसाई यांचे निधन.

हे पण पहा :- संधीतील आदेश

            तुम्हाला १५ मार्च दिनविशेष | 15 March Dinvishesh | 15 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad