२ मार्च दिनविशेष | 2 March Dinvishesh | 2 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 1, 2024

२ मार्च दिनविशेष | 2 March Dinvishesh | 2 March day special in Marathi

२ मार्च दिनविशेष

2 March Dinvishesh

2 March day special in Marathi

२ मार्च दिनविशेष | 2 March Dinvishesh | 2 March day special in Marathi

            २ मार्च दिनविशेष ( 2 March Dinvishesh | 2 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २ मार्च दिनविशेष ( 2 March Dinvishesh | 2 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२ मार्च दिनविशेष

2 March Dinvishesh

2 March day special in Marathi


@ संत मीराबाई यांचे पुण्यतिथी [Death anniversary of Saint Mirabai ]

[१५६८]=> मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई यांचे निधन.

[१७००]=> मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन.

[१७४२]=> नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म.

[१८३०]=> इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार डी. एच. लॉरेन्स यांचे निधन.

[१८५५]=> अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.

[१८५७]=> जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.

[१९०३]=> जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.

[१९२५]=> चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म.

[१९३१]=> मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.

[१९३१]=> सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.

[१९४६]=> हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.

[१९४९]=> न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.


[१९४९]=> प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन.

[१९५२]=> पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.

[१९५६]=> मोरोक्‍को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

[१९६९]=> जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या 
विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.

[१९७०]=> ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.

[१९७६]=> मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन.

[१९७७]=> इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म.

[१९७८]=> स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.

[१९९२]=> आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.

[१९९४]=> धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे निधन.

[२००१]=> बामियाँमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.


            तुम्हाला २ मार्च दिनविशेष | 2 March Dinvishesh | 2 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad