२१ मार्च दिनविशेष | 21 March Dinvishesh | 21 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 20, 2024

२१ मार्च दिनविशेष | 21 March Dinvishesh | 21 March day special in Marathi

२१ मार्च दिनविशेष

21 March Dinvishesh

21 March day special in Marathi

२१ मार्च दिनविशेष | 21 March Dinvishesh | 21 March day special in Marathi

            २१ मार्च दिनविशेष ( 21 March Dinvishesh | 21 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २१ मार्च दिनविशेष ( 21 March Dinvishesh | 21 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२१ मार्च दिनविशेष

21 March Dinvishesh

21 March day special in Marathi

@ आंतरराष्ट्रीय वन दिन [ International Forest Day]

[१५५६]=> ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्‍या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.

[१६८०]=> शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.

[१७६८]=> फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म.

[१८४७]=> कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म.

[१८५८]=> इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीस वेढा दिला.

[१८७१]=> ऑटो व्हॉन बिस्मार्क हे जर्मनीचा चॅन्सेलर बनला.

[१८८७]=> देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म.

[१९१६]=> भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म.

[१९२३]=> सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म.

[१९३५]=> शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.

[१९७३]=> आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.


[१९७३]=> कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन.

[१९७७]=> भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.

[१९७८]=> अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्म.

[१९८०]=> अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.

[१९८५]=> ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचे निधन.

[१९९०]=> नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

[२०००]=> फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

[२००१]=> दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई चे स्थापक चुंग जू-युंग यांचे निधन.

[२००३]=> जळगाव महानगरपालीकेची स्थापना.

[२००३]=> भारतीय लेखक शिवानी यांचे निधन.

[२००५]=> चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक दिनकर द. पाटील यांचे निधन.

[२००६]=> सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.

[२०१०]=> अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन.

[२०१२]=> आंतरराष्ट्रीय वन दिन


            तुम्हाला २१ मार्च दिनविशेष | 21 March Dinvishesh | 21 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad