२७ मार्च दिनविशेष | 27 March Dinvishesh | 27 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 26, 2024

२७ मार्च दिनविशेष | 27 March Dinvishesh | 27 March day special in Marathi

२७ मार्च दिनविशेष

27 March Dinvishesh

27 March day special in Marathi

२७ मार्च दिनविशेष | 27 March Dinvishesh | 27 March day special in Marathi

            २७ मार्च दिनविशेष ( 27 March Dinvishesh | 27 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २७ मार्च दिनविशेष ( 27 March Dinvishesh | 27 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२७ मार्च दिनविशेष

27 March Dinvishesh

27 March day special in Marathi

@ जागतिक रंगभूमी दिन [ World Theater Day ]

[१६६७]=> शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.

[१७८५]=> फ्रान्सचा राजा लुई (सतरावा) यांचा जन्म.

[१७९४]=> अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.

[१८४५]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचा जन्म.

[१८५४]=> क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

[१८६३]=> रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते हेन्री रॉयस यांचा जन्म.

[१८९८]=> भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन.

[१९०१]=> डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचा जन्म.

[१९५२]=> टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोटा यांचे निधन.

[१९५८]=> निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.


[१९६६]=> २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

[१९६७]=> नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचे निधन.

[१९६८]=> पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचे निधन.

[१९७७]=> तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अ‍ॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.

[१९९२]=> पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.

[१९९२]=> साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शरच्‍चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन.

[१९९७]=> संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर यांचे निधन.

[२०००]=> चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

[२०००]=> हिन्दी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली.

हे पण पहा :- सिद्ध शब्द

            तुम्हाला २७ मार्च दिनविशेष | 27 March Dinvishesh | 27 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad