९ मार्च दिनविशेष | 9 March Dinvishesh | 9 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 8, 2024

९ मार्च दिनविशेष | 9 March Dinvishesh | 9 March day special in Marathi

९ मार्च दिनविशेष

9 March Dinvishesh

9 March day special in Marathi

९ मार्च दिनविशेष | 9 March Dinvishesh | 9 March day special in Marathi

            ९ मार्च दिनविशेष ( 9 March Dinvishesh | 9 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ९ मार्च दिनविशेष ( 9 March Dinvishesh | 9 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

९ मार्च दिनविशेष

9 March Dinvishesh

9 March day special in Marathi


[१६५०]=> संत तुकाराम यांचा वैकुंठवास.

[१७९६]=> नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफिना शी लग्न केले.

[१८२४]=> अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म.

[१८५१]=> डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन.

[१८६३]=> गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म.

[१८८८]=> जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचे निधन.

[१८९९]=> महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म.

[१९३०]=> संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमद पठाण यांचा जन्म.

[१९३१]=> माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म.

[१९३३]=> अमेरिकन गायक-गीतकार लॉईड प्राईस यांचा जन्म.

[१९३४]=> पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचा जन्म.

[१९३५]=> क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म.

[१९४३]=> अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स ऊर्फ बॉबी फिशर यांचा जन्म.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.


[१९५१]=> प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.

[१९५२]=> पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.

[१९५६]=> केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ शशी थरूर यांचा जन्म.

[१९५९]=> बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.

[१९६९]=> उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन.

[१९७०]=> भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.

[१९७१]=> दिगदर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचे निधन.

[१९८५]=> भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म.

[१९९१]=> युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने.

[१९९२]=> इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचे निधन.

[१९९२]=> कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.

[१९९४]=> पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन.

[२०००]=> अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. 

[२०१२]=> चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचे निधन.


            तुम्हाला ९ मार्च दिनविशेष | 9 March Dinvishesh | 9 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad