होळी भाषण मराठी | Holi Speech in Marathi | Holi Bhashan Marathi | Holi Marathi Essay - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 21, 2024

होळी भाषण मराठी | Holi Speech in Marathi | Holi Bhashan Marathi | Holi Marathi Essay

होळी भाषण मराठी

Holi Speech in Marathi

Holi Bhashan Marathi

Holi Marathi Essay

होळी सणाचे भाषण मराठी ( Holi Speech in Marathi | Holi Bhashan Marathi | Holi Marathi Essay ) येथे देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.
होळी भाषण मराठी | Holi Speech in Marathi | Holi Bhashan Marathi | Holi Marathi Essay
होळी सण ( Holi festival ) आपल्या भारत देशातील प्रमुख सणांपैकी एक सण असून तो भारतीय संस्कृतीचा एक प्रमुख धार्मिक उत्सव आहे. होळी हा शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर रंग येतात. होळी हा सण आता तो फक्त भारताचा नसून तो जगभरात साजरा होणारा सण बनला आहे. हा सण भारतात आनंद, प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे. होली एक सांस्कृतिक महोत्सव आहे जिथे लोक आपल्यातील पूर्वग्रह आणि विविध सामाजिक प्रतिष्ठा यांना सोडून देऊन होळी सण साजरा करतात. या सणामध्ये लोक आपल्या सवयी, परंपरा आणि धार्मिक आराधना यांचा आदर करून भारतीय समाजासाठी एक आनंददायी वातावरण निर्माण करतात.


होळी सण फाल्गुन या मराठीतील शेवटच्या महिण्यातील पौर्णिमेला येणारा शेवटचा सण आहे. अर्थात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णीमेला साजरा केला जातो. या सणाला रंगाचा सण, वसंतोत्सव आणि प्रेमाचा सण असे देखील म्हटले जाते. हा सण देशभरात सर्वत्र साजरा केला जातो. तेव्हा गरीब-श्रीमंत सर्वजण हा सण उत्साहात साजरा करतात. परंतु हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. हा सण सर्वांचा आवडता असतो. होळीचा रंगीबेरंगी सण वसंत ऋतुची मजा वाढवतो म्हणून या सणाला वसंतोत्सव असे देखील म्हटले जाते. याच दिवसापासून वसंत ऋतूचे आगमन हते व हिवाळ्यायाचा शेवट होते असे मानले जाते. सणाची सुरवात होळी दहन करून होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर मनसोक्त रंगांची उधळण करून रंगांची होळी खेळली जाते. त्यालाच धुलिवंदन, धुळवड किंवा शिमगा असेही म्हटले जाते. भारतात काही ठिकाणी होळी पाच दिवस तर काही ठिकाणी महिनाभर साजरी केली जाते.


होळी सण साजरे करण्यामागचे उद्देश

होळी सण हा आपल्यातील वाईट, अमंगल व नकारात्मक विचारांचा नाश करून आपल्यात चांगले, मंगलमय व सकारात्मक विचार रुजावेत व आपल्या रंगहीन आयुष्यात रंगांमुळे रंग भरले जावेत या उद्देशाने होळी हा सण साजरा केला जातो. तसेच या सणात सर्व जाती, धर्म, पंथ, श्रीमंत, गरीब, स्री, पुरुष, लहान, मोठे असेच सर्वच सहभागी होतात त्यामुळे त्यांच्यात आपुलकी व प्रेम वाढते.


होळी सणाची कथा

होळी साजरी करण्यामागे प्रल्हाद भक्ताची एक धार्मिक कथा प्रचलित आहे. असे म्हटले जाते की फार वर्षापूर्वी देव व दानव यांच्यात सतत युद्ध व्हायचे तेव्हा हिरण्यकश्यप नावाचा एक दानवाचा राजा होता तो खूप शक्तिशाली व क्रूर राजा होता. त्याला आपल्या शक्तीचा गर्व होता. त्याला देवांचे अस्तित्वच मान्य नव्हते त्याने त्याच्या राज्यात देवांची पूजा करण्यास त्याने प्रतिबंध लावला होता. तो तेथील लोकांना फार त्रास द्यायचा परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा निसीम भक्त होता. त्याला त्याचा फार राग यायचा. त्याने बऱ्याचदा समजवण्याचा प्रयत्न केला. परन्तु तो काही त्याचे ऐकेना त्यामुळे त्याला मारण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी त्याचे प्राण वाचविण्यासाठी विष्णू भगवान मदत करत असत. म्हणून त्याने रागात येऊन त्याच्या बहिणीला म्हणजे होलीकाला बोलावले तिला अग्नी जाळणार नाही असा वरदान होता. तेव्हा एक चिता रचण्यात आली व त्यावर तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली व चिता जाळण्यास सांगितली परंतु तेव्हा त्याचीतेत हिलिका जळाली परंतु प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्यामुळे दरवर्षी होळीच्या तिचे दहन केले जाते जो विजयाचे प्रतिक व असत्य आणि अधर्माचा पराजय दर्शवतो. काही लोक होळी हा रब्बी कापणीचा सण मानतात. चांगले पीक येण्यासाठी हा सण साजरा केला जातो,


होळी सण कसा साजरा करतात?

होळीच्या सणाची तयारी काही दिवस आधीच सुरू होते. बाजारपेठा रंग आणि घागरींनी भरलेल्या असतात. गुलाल, पिचकारी. रंगाचे फुगे, पांढरे कुर्ते, व होळीसाठी शोभेल असे कपडे व वेगवेळ्हेया प्रकारच्या मिठाई हे सर्व आपल्याला बाजारपेठेत पहायला मिळतात. होळी जाळण्यासाठी लाकडे गोळा केली जातात. होळीच्या दिवशी संध्याकाळी सर्व जन एकत्र जमतात. लाकडांची रास रचतात त्यामध्ये लाकडे, गौरी टाकली जाते. त्याच्या भोवती रांगोळी काढतात व ती पेटवतात. विवाहित महिला नारळ, कुंकू, तांदूळ, नवीन धान्य आणि पुरणपोळी व इतर गोडधोड पदार्थांचे नेवैद्य दाखवतात. त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात व आपल्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करतात. लहान मुले, म्हातारे आणि तरुण सगळेच उत्तेजित होऊन मोठमोठ्याने होळीचे गीत गातात, वाद्य वाजवतात व नाचू लागतात. भारतातील सण म्हटले म्हणजे खानपानाशिवाय थोडेच असणार तेव्हा येथे सर्व लोक एकत्र जमतात व खाण्याचा आनंद लुटता त्यामध्ये विशेष करून एक मिठाई बनवली जाते तिला गुजिया असे म्हणतात. तसेच अनेक ठिकाणी मालपुआ, थंडाई या पदार्थांसोबत भांग पिण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो.


धुलीवंदन / धुळवड

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन, धुलेंडी किंवा धुळवड खेळली जाते. यालाच रंगांचा सण असे देखील म्हटले जाते. त्या दिवशी संपूर्ण देशभर लोक रंगानी खेळतात. एकमेकांना रंग लावतात. पाण्याचे फुगे फेकून मारतात. यादिवीशी केवळ कपडेच नाही तर हृदयेही रंगांनी रंगीबेरंगी होतात. लोक एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. सर्व हा सण आनंदात व उत्साहात खेळतात. या दिवशी सर्व रंग एकत्र पणे खेळले जातात. तसेच सर्व जाती, धर्म, गरीब, श्रीमंत असा भेदभाव नकरता सर्वच हा सण खेळतात हा सण सर्वना एकत्रित बांधून ठेवत असतो त्यांमुळे देशात समानता, एकता आणि प्रेमाची भावना दर्शवतो.

होळी या सणाला काही विक्षिप्त लोक गालबोट लावतात. काही वाईट परंपराही होळीशी संबंधित आहेत. काही लोक होळीच्या निमित्ताने अश्लील गाणी गातात, मद्यपान करतात, नशेचे पदार्थ सेवन करतात व इतर लोकांशी असभ्यपणाना वागतात. काही लोक रंगाऐवजी एकमेकांवर चिखलफेक करतात. काही लोक विषारी अनैसर्गिक रंगानाचा वापर करतात. हे रंग डोळ्यांना आणि त्वचेला हानी पोहोचवतात. या वाईट गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. कृपया करून आपण असे रंग वापरू नये. होली हा एक परित्र सण आहे. त्याचे महत्व आपण समजून घ्यायला हवे व ते इतरानाही समजावून सांगायला हवे. या दिवशी आपण आनंद लुटा, इतरावर प्रेम करा आणि एकतेचे पर्व पर्व बनवण्यासाठी प्रयत्न करा.

हे पण पहा :- महाराष्ट्र दिन

होळी साजरी करण्याचे फायदे / महत्व?

१] होळीमुळे लोकांमध्ये आपुलकी व प्रेम वाढते.
२] होलिका अग्नीमुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते.
३] होलिका अग्नीमुळे परिसरात असलेले जीवाणू मरतात.
४] होलिकेला प्रदक्षिणा घातल्याने अग्नी शरीराला अधिक ऊर्जा मिळवून देतो.
५] होळी खेळण्यासाठी हळदीसारखे नैसर्गिक रंग वापरल्यास शरीर शुद्ध होते.
६] फुलांच्या रसापासून तयार केलेला रंग वापरल्यास त्याचा शरीराला फायदा होतो. 
७] सतत मोबाई व संगणक व टेलीव्हिजन पाहत बसणारे थोडा वेळ का होईना बाहेर खेळतील.


            होळी सण केव्हा, कसा व का?  साजरा केला जातो व त्याचे उद्देश, महत्व काय? या विषयी आपणाला येथे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर होळी सणाचे भाषण मराठी ( Holi Speech in Marathi | Holi Bhashan Marathi | Holi Marathi Essay ) ही माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad