१ मे दिनविशेष | 1 May Dinvishesh | 1 May day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 30, 2024

१ मे दिनविशेष | 1 May Dinvishesh | 1 May day special in Marathi

१ मे दिनविशेष

1 May Dinvishesh

1 May day special in Marathi

१ मे दिनविशेष | 1 May Dinvishesh | 1 May day special in Marathi

            १ मे दिनविशेष ( 1 May Dinvishesh | 1 May day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १ मे दिनविशेष ( 1 May Dinvishesh | 1 May day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१ मे दिनविशेष

1 May Dinvishesh

1 May day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय कामगार दिन [ International Labor Day ]

@ जागतिक कामगार दिन [ World Labor Day ]

@ महाराष्ट्र दिन [ Maharashtra Day ]

[१२१८]=> जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म.

[१७०७]=> किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.

[१७३९]=> चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.

[१८४०]=> द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले.

[१८४४]=> हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.

[१८८२]=> आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.

[१८८४]=> अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.

[१८८६]=> आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्‍या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.

[१८९०]=> जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.

[१८९७]=> रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.

[१९१३]=> अभिनेता बलराज साहनी यांचा जन्म.

[१९१५]=> हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म.

[१९१९]=> भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म.

[१९२२]=> स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म.

[१९२७]=> जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.

[१९३०]=> सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.

[१९३२]=> कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जन्म.

[१९४०:]=> युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.

[१९४३]=> नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा जन्म.


[१९४४]=> केंद्रीय मंत्री आणि आमदार सुरेश कलमाडी यांचा जन्म.

[१९४५]=> जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता जोसेफ गोबेल्स यांचे निधन.

[१९५८]=> नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन.

[१९६०]=> गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

[१९६०]=> मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.

[१९६१]=> क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.

[१९६२]=> महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.

[१९७१]=> भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर अजित कुमार यांचा जन्म.

[१९७२]=> उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचे निधन.

[१९७८]=> जपान चे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.

[१९८३]=> अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.

[१९९३]=> स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना. ग. गोरे यांचे निधन.

[१९९८]=> पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.

[१९९९]=> नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.

[२००९]=> स्वीडन मध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला.

[२०१३]=> निखील एकनाथ खडसे यांचे निधन.


            तुम्हाला १ मे दिनविशेष | 1 May Dinvishesh | 1 May day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad