१० एप्रिल दिनविशेष | 10 April Dinvishesh | 10 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 9, 2024

१० एप्रिल दिनविशेष | 10 April Dinvishesh | 10 April day special in Marathi | Today day special Marathi

१० एप्रिल दिनविशेष

10 April Dinvishesh

10 April day special in Marathi

Today day special Marathi

१० एप्रिल दिनविशेष | 10 April Dinvishesh | 10 April day special in Marathi | Today day special Marathi

            १० एप्रिल दिनविशेष ( 10 April Dinvishesh | 10 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १० एप्रिल दिनविशेष ( 10 April Dinvishesh | 10 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१० एप्रिल दिनविशेष

10 April Dinvishesh

10 April day special in Marathi


@ राष्ट्रीय भावंड दिन [National Sibling Day]

[१३१७]=> संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले.

[१६७८]=> रामदास स्वामींची लाडकी कन्या वेणाबाई यांचे निधन.

[१७५५]=> होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्म.

[१८१३]=> इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचे निधन.

[१८४३]=> विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म.

[१८४७]=> हंगेरियन-अमेरिकन राजकीय नेते आणि पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर यांचा जन्म.

[१८८०]=> वृत्तपत्रकार तसेच उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी यांचा जन्म.

[१८९४]=> बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म.

[१८९७]=> भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन यांचा जन्म.

[१९०१]=> अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ यांचा जन्म.

[१९०७]=> नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार मो. ग. रांगणेकर यांचा जन्म.

[१९१२]=> इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.

[१९१७]=> गांधी चंपारण्याला आगमन

[१९१७]=> भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी यांचा जन्म.

[१९२७]=> भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचा जन्म.

[१९३१]=> लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी आणि लेखक खलील जिब्रान यांचे निधन.

[१९३१]=> शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा जन्म.

[१९३७]=> ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन.

[१९४९]=> पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचे निधन.

[१९५२]=> भारतीय राजकारणी नारायण राणे यांचा जन्म.

[१९५५]=> योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.

[१९६५]=> स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन.

[१९७०]=> पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.

[१९७२]=> स्काईप चे सहसंस्थापक प्रेसिंड कासासुलु यांचा जन्म.

[१९७५]=> भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा जन्म.

[१९९५]=> भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन.

[२०००]=> संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचे निधन.


            तुम्हाला १० एप्रिल दिनविशेष | 10 April Dinvishesh | 10 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad