१८ एप्रिल दिनविशेष | 18 April Dinvishesh | 18 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 17, 2024

१८ एप्रिल दिनविशेष | 18 April Dinvishesh | 18 April day special in Marathi | Today day special Marathi

१८ एप्रिल दिनविशेष

18 April Dinvishesh

18 April day special in Marathi

Today day special Marathi

१८ एप्रिल दिनविशेष | 18 April Dinvishesh | 18 April day special in Marathi | Today day special Marathi

            १८ एप्रिल दिनविशेष ( 18 April Dinvishesh | 18 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १८ एप्रिल दिनविशेष ( 18 April Dinvishesh | 18 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१८ एप्रिल दिनविशेष

18 April Dinvishesh

18 April day special in Marathi


@ जागतिक वारसा दिन [World Heritage Day]

[१३३६]=> हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.

[१७०३]=> औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.

[१७२०]=> शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.

[१७७४]=> सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म.

[१८३१]=> युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली.

[१८५३]=> मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.

[१८५८]=> स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म.

[१८५९]=> स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचे निधन.

[१८९८]=> जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.

[१८९८]=> महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांना फाशीची शिक्षा.

[१९१२]=> टायटॅनिक मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन कार्पेथिया हे जहाज न्यूयॉर्कला पोचले.

[१९१६]=> हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म.

[१९२३]=> पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील पहिल्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली.

[१९२४]=> सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.

[१९३०]=> आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.

[१९३०]=> क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.

[१९३६]=> पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.

[१९४५]=> व्हॅक्यूम ट्यूब चे शोधक जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग यांचे निधन.

[१९५०]=> आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

[१९५४]=> गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.

[१९५५]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचे निधन.

[१९५८]=> वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचा जन्म.

[१९६२]=> हिंदी चित्रपट अभिनेत्री पूनम धिल्लन यांचा जन्म.

[१९६६]=> योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचे निधन.

[१९७१]=> एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.

[१९७२]=> विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे निधन.

[१९९१]=> डॉ. वृषाली करी यांचा जन्म.

[१९९५]=> पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते यांचे निधन.

[१९९९]=> आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह यांचे निधन.

[२००१]=> भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D1 वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.

[२००२]=> नॉर्वेजियन दर्यावर्दी संशोधक थोर हेअरडल यांचे निधन.

[२००२]=> महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष शरद दिघे यांचे निधन.


            तुम्हाला १८ एप्रिल दिनविशेष | 18 April Dinvishesh | 18 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad