३० एप्रिल दिनविशेष
30 April Dinvishesh
30 April day special in Marathi
Today day special Marathi
३० एप्रिल दिनविशेष ( 30 April Dinvishesh | 30 April day special in Marathi | Today day special marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३० एप्रिल दिनविशेष ( 30 April Dinvishesh | 30 April day special in Marathi | Today day special marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३० एप्रिल दिनविशेष
30 April Dinvishesh
30 April day special in Marathi
@ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती. [Rashtrasant Tukdoji Maharaj's birth anniversary]
[१०३०]=> तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक मोहंमद गझनी यांचे निधन.
[१४९२]=> स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी कमीशन दिले.
[१६५७]=> शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.
[१७७७]=> जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचा जन्म.
[१७८९]=> जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.
[१८७०]=> भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म.
[१८७८]=> साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्कलकोट यांनी समाधी घेतली.
[१९०९]=> माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म.
[१९१०]=> साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री राव यांचा जन्म.
[१९१३]=> व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन.
[१९२१]=> जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म.
[१९२६]=> मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म.
[१९३६]=> वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
[१९४५]=> जर्मनीचे नाझी हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली.
[१९७७]=> ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
[१९८२]=> कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.
[१९८७]=> भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जन्म.
[१९९५]=> उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
[१९९६]=> थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्घाटन झाले.
[२००१]=> प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचे निधन.
[२००३]=> मराठी साहित्यिक वसंत पोतदार यांचे निधन.
[२००९]=> ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
[२०१४]=> भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी यांचे निधन.
हे पण पहा :- भारतातील नृत्यप्रकार
तुम्हाला ३० एप्रिल दिनविशेष | 30 April Dinvishesh | 30 April day special in Marathi | Today day special marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box