५ एप्रिल दिनविशेष | 5 April Dinvishesh | 5 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 4, 2024

५ एप्रिल दिनविशेष | 5 April Dinvishesh | 5 April day special in Marathi | Today day special Marathi

५ एप्रिल दिनविशेष

5 April Dinvishesh

5 April day special in Marathi

Today day special Marathi

५ एप्रिल दिनविशेष | 5 April Dinvishesh | 5 April day special in Marathi | Today day special Marathi

            ५ एप्रिल दिनविशेष ( 5 April Dinvishesh | 5 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ५ एप्रिल दिनविशेष ( 5 April Dinvishesh | 5 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

५ एप्रिल दिनविशेष

5 April Dinvishesh

5 April day special in Marathi


@ राष्ट्रीय सागरी दिन [ National Maritime Day of India ]

[१६६३]=> दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली.

[१६७९]=> राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.

[१८२७]=> निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचा जन्म.

[१८५६]=> अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचा जन्म.

[१९०८]=> स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचा जन्म.

[१९०९]=> जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचा जन्म.

[१९१६]=> हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचा जन्म.

[१९१७]=> स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचे निधन.

[१९२०]=> इंग्लिश कादंबरीकार आर्थर हॅले यांचा जन्म.

[१९२०]=> महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचा जन्म.

[१९२२]=> आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन.

[१९४०]=> इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज यांचे निधन.

[१९५७]=> कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.

[१९६४]=> नकलाकार गोपाळ विनायक भोंडे यांचे निधन.

[१९६६]=> भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.

[१९९३]=> हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचे निधन.

[१९९६]=> बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन यांचे निधन.

[१९९८]=> चित्रपट व नाट्य अभिनेत्री रुही बेर्डे यांचे निधन.

[१९९९]=> राष्ट्रीय समुद्री दिवस भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना झालं.

[२०००]=> अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.

[२०००]=> जळगाव नगरपालिकेच्या १७ माजली इमारतीचे उद्घाटन.

[२००२]=> दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया यांचे निधन.


            तुम्हाला ५ एप्रिल दिनविशेष | 5 April Dinvishesh | 5 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad