६ एप्रिल दिनविशेष | 6 April Dinvishesh | 6 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 5, 2024

६ एप्रिल दिनविशेष | 6 April Dinvishesh | 6 April day special in Marathi | Today day special Marathi

६ एप्रिल दिनविशेष

6 April Dinvishesh

6 April day special in Marathi

Today day special Marathi

६ एप्रिल दिनविशेष | 6 April Dinvishesh | 6 April day special in Marathi | Today day special Marathi

            ६ एप्रिल दिनविशेष ( 6 April Dinvishesh | 6 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ६ एप्रिल दिनविशेष ( 6 April Dinvishesh | 6 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

६ एप्रिल दिनविशेष

6 April Dinvishesh

6 April day special in Marathi


@ विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन [ International Day of Sports for Development and Peace ]

[११९९]=> इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचे निधन.

[१६५६]=> शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.

[१७७३]=> स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचा जन्म.

[१८६४]=> ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म.

[१८९०]=> उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचा जन्म.

[१८९०]=> फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते अँटनी फोक्कर यांचा जन्म.

[१८९२]=> डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस यांकॅह जन्म.

[१८९६]=> आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.

[१९०९]=> भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचा जन्म.

[१९१७:]=> पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

[१९१७]=> मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म.

[१९१९]=> कोंकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित यांचा जन्म.

[१९२७]=> उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म.

[१९२८]=> फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचा जन्म.

[१९३०]=> प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.

[१९३१]=> बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचा जन्म.

[१९५५]=> धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन.

[१९५६]=> क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसरकर यांचा जन्म.

[१९६५]=> व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला

[१९६६]=> भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.

[१९८०]=> भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.

[१९८१]=> मानवधर्माचे उपासक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर यांचे निधन.

[१९८३]=> भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचे निधन.

[१९८९]=> ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचे निधन.

[१९९२]=> अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचे निधन.

[१९९८]=> भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्‍या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.

[१९९८]=> स्तनांचा कर्करोग बरा करणार्‍या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.

[२०००]=> मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.


            तुम्हाला ६ एप्रिल दिनविशेष | 6 April Dinvishesh | 6 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad